Join us

शत्रुघ्न सिन्हा अन् त्रिशालाच्या भेटीत ‘या’ व्यक्तींची चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 20:34 IST

अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. ती नेहमीच तिच्या फोटोंवरून चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिने ...

अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. ती नेहमीच तिच्या फोटोंवरून चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिने पापा संजय दत्तसोबत एक सेल्फी शेअर केला होता. दरम्यान, सध्या त्रिशाला ज्येष्ठ अभिनेते तथा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबतच्या भेटीमुळे चर्चेत आहे. त्रिशालाने नुकतीच शत्रुघ्न सिन्हा यांची भेट घेतली. या भेटीचे काही फोटोज् शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केले आहेत. त्रिशाला संजूबाबाची पहिली पत्नी ऋचा शर्मा हिची मुलगी आहे. सध्या ती न्यूयॉर्क येथे मावशीसोबत राहते. बॉलिवूडपासून दूर असलेल्या त्रिशालाची नुकतीच दुबई येथे शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत भेट झाली. या भेटीचे काही फोटोज् शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केले. त्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, ‘दुबईत सुनील दत्त यांची नात त्रिशालासोबत भेट झाली. तिने अगदी मनमोकळेपणाने सांगितले की, ती माझी मुलगी सोनाक्षी सिन्हाची मोठी फॅन आहे. सोनाक्षीनेसुद्धा या गोष्टीची नोंद घ्यायला हवी. दोघींनाही शुभेच्छा!’ दरम्यान, संजय दत्त आणि ऋचा शर्मा यांनी १९८७ मध्ये लग्न केले होते. त्रिशालाचा जन्म १९८८ मध्ये झाला. ऋचाला ब्रेन ट्यूमर होता. ज्यामुळे १० डिसेंबर १९९६ मध्ये तिचे निधन झाले. आईच्या निधनानंतर त्रिशाला न्यू यॉर्क येथेल मावशी एनासोबत राहात आहे. संजय दत्तने एका मुलाखतीत म्हटले होते की, त्रिशालाने चित्रपटांमध्ये काम करावे, असे मला वाटत नाही. तिने दर्जेदार शिक्षण घेऊन अन्य क्षेत्रांमध्ये आपला दबदबा निर्माण करावा.