काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी नुकतंच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' ही सीरिज पाहिली आणि ते भारावून गेले. सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने या वेबसीरिजच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. थरुर यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक सविस्तर पोस्ट लिहून वेबसीरिजचे तोंडभरून कौतुक केले आहे. तसेच या सीरिजला त्यांनी "परिपूर्ण OTT गोल्ड" असेदेखील म्हटले आहे.
शशी थरूर यांनी आपल्या पोस्टमध्ये खुलासा केला की, गेल्या दोन दिवसांपासून सर्दी आणि खोकल्यामुळे त्यांनी आपल्या अनेक सार्वजनिक भेटी आणि कामे रद्द केली होती. याच रिकाम्या वेळेत त्यांनी बहिण स्मिता थरूर आणि स्टाफच्या सांगण्यावरून ही सीरिज पाहण्याचे ठरवले. थरूर यांनी ट्विटमध्ये लिहिलं, "मी दोन दिवसांपासून सर्दी-खोकल्याने त्रस्त आहे आणि अनेक कार्यक्रम रद्द केले आहेत. माझ्या स्टाफने आणि बहिण स्मिता थरूरने मला काम बाजूला ठेवून नेटफ्लिक्सवर 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' पाहायला लावलं आणि ती माझ्यासाठी सध्याची सर्वात चांगली गोष्ट ठरली आहे, ही सीरिज परिपूर्ण OTT गोल्ड आहे".
थरूर यांनी आर्यन खानच्या कामाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, "'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' ही आर्यन खानची दिग्दर्शनातील पहिली कलाकृती पाहिल्यानंतर माझ्याकडे कौतुकासाठी शब्दच नाहीत. ही सीरिज हळूहळू तुमच्या मनात घर करते आणि एकदा पाहायला सुरुवात केल्यावर तुम्ही त्यात पूर्णपणे अडकून पडता". 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधील बारकावे स्पष्ट करताना ते पुढे म्हणाले, "लेखन अत्यंत धारदार, दिग्दर्शन निर्भीड आणि या उपरोधिक कथानकाची धाडसी मांडणी बॉलिवूडसाठी खूप गरजेची होती. हा शो ग्लॅमरच्या पलीकडील जगाची अंतर्बाह्य बाजू मांडतो. सात भागांच्या या सीरिजनमधून एक स्टोरीटेलिंग पॉवरहाऊस जन्माला आल्याचं जाहीर दिसतंय. शाबास, आर्यन खान... तू एक मास्टरपीस दिलं आहे. 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' एकदम भन्नाट आहे".
आर्यन खानचे कौतुक केल्यावर थरुर यांनी त्याचे वडील शाहरुख खानसाठी लिहिलं, "एक वडील म्हणून दुसऱ्या वडिलांना मी एवढंच म्हणू शकतो, शाहरुख नक्कीच अभिमानाने तुझा ऊर भरून आला असावा". शशी थरूर यांच्या या कौतुकास्पद पोस्टमुळे नेटीझन्समध्ये दोन गट पडले आहेत. अनेक जण शशी थरूर यांच्या मताशी सहत आहेत. तर काहींना शशी थररू यांचं हे ट्विट 'पेड रिव्ह्यू' असल्याचं म्हटलं. मात्र, थरूर यांनी लगेचच 'माझ्या मित्रा, मी विकला जाणारा नाही. मी दिलेले कोणतेही मत कधीही, कोणाकडूनही, रोखीत किंवा वस्तूच्या स्वरूपात, पैसे घेऊन दिलेले नाही" असे सडेतोड उत्तर देत 'पेड रिव्ह्यू' म्हणाऱ्यांची बोलती बंद केली.
Web Summary : Shashi Tharoor lauded Aryan Khan's directorial debut, 'The Bad Boys of Bollywood,' calling it 'perfect OTT gold'. He praised the sharp writing, fearless direction, and its insightful portrayal of Bollywood's inner workings, dismissing claims of a paid review.
Web Summary : शशि थरूर ने आर्यन खान के निर्देशन में बनी पहली फिल्म 'द बैड बॉयज़ ऑफ़ बॉलीवुड' की सराहना करते हुए इसे 'परिपूर्ण ओटीटी गोल्ड' बताया। उन्होंने तीक्ष्ण लेखन, निडर निर्देशन और बॉलीवुड के अंदरूनी कामकाज के चित्रण की प्रशंसा की और पेड रिव्यू के दावों को खारिज कर दिया।