Join us
Daily Top 2Weekly Top 5

​शशी कपूर यांच्या प्रार्थना सभेला या कारणामुळे उपस्थित राहू शकले नाही करिना कपूर, रणबीर कपूर आणि ऋषी कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 16:48 IST

४ डिसेंबर २०१७ ला अभिनेते शशी कपूर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने अख्खे बॉलिवूड शोकाकूल झाले. शशी कपूर यांचे ...

४ डिसेंबर २०१७ ला अभिनेते शशी कपूर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने अख्खे बॉलिवूड शोकाकूल झाले. शशी कपूर यांचे पार्थिव रूग्णालयातून थेट त्यांच्या घरी ‘जानकी कुटी’ येथे नेण्यात आले. याठिकाणी काही वेळ त्यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यानंतर सांताक्रूज हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.  शशी कपूर यांना २०११ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार मिळाला होता. पद्मविभूषणने गौरविण्यात आलेल्या व्यक्तींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतात. शशी कपूर यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी तीन राऊंड फायरिंग करण्यात आले. पोलिसांची एक तुकडी यावेळी उपस्थित होती. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी शशी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी स्मशानभूमीत पोहोचले होते. ऋषी कपूर, नीतू कपूर, रणबीर कपूर, करीना कपूर, करिनाचा पती सैफ अली खान, करिश्मा कपूर या सगळ्या कपूर कुटुंबीयांसह अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, श्वेता नंदा, काजोल, बोनी कपूर, राणी मुखर्जी, नसिरूद्दीन शहा, शक्ती कपूर यांच्यासह अनेक कलाकार यावेळी स्मनाशभूमीत उपस्थित होते.शशी कपूर यांच्या अंतिम दर्शनासाठी संपूर्ण कपूर कुटुंब उपस्थित असले तरी त्यांच्या प्रार्थना सभेला या कुटुंबातील अनेकजण उपस्थित राहू शकले नाहीत. शशी कपूर यांचे पुतणे ऋषी कपूर आणि शशी कपूर यांची नातवंडं करिना आणि रणबीर प्रार्थना सभेला नसल्याने ते कुठे आहेत असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. शशी कपूर यांचे निधन झाले त्यावेळी ऋषी कपूर एका चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र होते. त्यांना ही बातमी कळताच चित्रीकरण सोडून ते शशी यांच्या घरी रवाना झाले होते. ऋषी, करिना आणि रणबीर या तिघांनीही कित्येक महिने आधीच त्यांच्या चित्रीकरणाच्या तारखा दिलेल्या आहेत. त्यामुळेच शो मस्ट गो ऑन या राज कपूर यांच्या फेमस संवादाप्रमाणे त्यांनी देखील त्यांचे काम सुरूच ठेवले. शशी कपूर यांच्या प्रार्थना सभेच्या वेळी करिना वांद्रे येथे चित्रीकरण करत होती तर रणबीर चित्रीकरणासाठी परदेशात होता तर ऋषी कपूर त्यांच्या चित्रपटासाठी दिल्लीत चित्रीकरण करत होते. Also Read : शशी कपूर यांच्या या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी साकारली होती एक्स्ट्राची भूमिका