Join us

 छप्पर फाड के...! काही तासांत बदलले या नवख्या अभिनेत्रीचे नशीब!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 15:56 IST

ऊपर वाला जब भी देता है छप्पर फाड के देता है, अशी हिंदीत एक म्हण आहे. या नव्या अभिनेत्रीला प्रत्यक्षात याच म्हणीचा प्रत्यय आला.

ठळक मुद्दे‘बंटी और बबली 2’ हा 2005 मध्ये आलेल्या ‘बंटी और बबली’चा सीक्वल आहे.

ऊपर वाला जब भी देता है छप्पर फाड के देता है, अशी हिंदीत एक म्हण आहे. या नव्या अभिनेत्रीला प्रत्यक्षात याच म्हणीचा प्रत्यय आला. विश्वास बसणार नाही, पण केवळ काही तासांत या अभिनेत्रीला दोन मोठे प्रोजेक्ट मिळाले. या अभिनेत्रीचे नाव आहे, शर्वरी.यशराज फिल्म्सच्या ‘बंटी और बबली 2’ या सिनेमात शर्वरीची वर्णी लागली आहे. याशिवाय सुप्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खानच्या ‘द फॉरगॉटन आर्मी’ या वेबसीरिजमध्येही ती एन्ट्री झालीय. ही वेबसीरिज नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ‘आझाद हिंद ’ सेनेवर आधारित आहे. या दोन मोठ्या प्रोजेक्टमुळे शर्वरी सध्या जाम चर्चेत आहे.

एका मुलाखतीत शर्वरीने याबद्दलचा आनंद व्यक्त केला. एकीकडे यशराज फिल्म्सने मला अभिनेत्री म्हणून लॉन्च करण्याची घोषणा केली आणि दुसरीकडे कबीर खान यांच्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टमध्ये माझी एन्ट्री झाली. तो दिवस माझ्यासाठी सर्वाधिक खास होता. काही तासांत मला हे दोन प्रोजेक्ट मिळाले. क्षणभर मी स्वप्न पाहतेय, असेच मला वाटले होते, असे शर्वरी म्हणाली.

मला लहानपणापासून अभिनेत्री बनायचे होते. यशराजच्या चित्रपटाची अभिनेत्री बनणे हे तर माझे मोठे स्वप्न होते. पण पहिलाच चित्रपट यशराजसोबत असेल, असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. यशराजसोबत काम करण्याची संधी मिळणे यातच सगळे आले. मी स्वत:ला यासाठी नशीबवान समजते. कबीर खान यांनीही मला संधी दिली. माझ्यावर विश्वास दाखवला, हे सगळेच स्वप्नवत आहे, असेही ती म्हणाली.

‘बंटी और बबली 2’ हा 2005 मध्ये आलेल्या ‘बंटी और बबली’चा सीक्वल आहे. यात शर्वरीसोबत सिद्धांत चतुर्वेदी लीड भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :बॉलिवूड