Join us
Daily Top 2Weekly Top 5

शर्मिला टागोर यांचा पोस्टर्सवरील बिकिनी अवतार बघून सासूचा झाला होता संताप !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2017 16:15 IST

सध्या बॉलिवूडमध्ये बिकिनी सीन्स देणे कॉमन बाब आहे; त्यामुळे कदाचित बॉलिवूडमधील एकही अशी अभिनेत्री नसेल जिने बिकिनी सीन्स दिले ...

सध्या बॉलिवूडमध्ये बिकिनी सीन्स देणे कॉमन बाब आहे; त्यामुळे कदाचित बॉलिवूडमधील एकही अशी अभिनेत्री नसेल जिने बिकिनी सीन्स दिले नसतील. मात्र एक काळ असाही होता की, बिकिनी घालणे पाप समजले जायचे. प्रेक्षकच त्या अभिनेत्रीला चरित्रहीन घोषित करायचे. अशातही काही बॉलिवूड अभिनेत्रींनी बिकिनी सीन्स देण्याचे धाडस केले होते. त्यामध्ये कश्मीर की कली शर्मिला टागोर यांचे नाव आघाडीवर होते. त्याकाळी शर्मिला यांनी बिकिनी फोटो काढून खळबळ उडवून दिली होती. ६० आणि ७०च्या दशकात चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणाºया शर्मिला यांनी बिकिनी फोटो काढून इंडस्ट्रीत खळबळ उडवून दिली होती. मात्र यामुळे त्यांच्या सासूचा प्रचंड संताप झाला होता. जेव्हा त्यांनी शर्मिलाचे पोस्टरवर बिकिनी फोटो बघितले तेव्हा त्या थेट शर्मिला यांना भेटायला गेल्या होत्या. खरं तर शर्मिलाच्या या फोटोंमुळे लोकांमध्ये त्यांची इमेज बोल्ड अशी झाली होती. लोकांमध्ये त्यांच्या नावाच्या चर्चाही घडू लागल्या. वास्तविक, शर्मिला यांनी ‘फिल्मफेअर’साठी हे फोटोशूट केले होते. साप्ताहिकाच्या कव्हर पेजवर त्यांचा बिकिनी फोटो त्याकाळी झळकला होता. शर्मिला यांचा तो बिकिनी फोटो त्याकाळी मुंबईच्या कानोकोपºयात झळकत होता. शहरातील प्रत्येक भागात बिकिनी अवतारातील हे फोटो लोकांचे मनोरंजन करणारे ठरले होते. त्याकाळी शर्मिला यांचे लग्न क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी यांच्याबरोबर होणार होते. जेव्हा मन्सूर पतौडी यांच्या आईने शर्मिला यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती, तेव्हा शर्मिला प्रचंड घाबरल्या होत्या. त्यांना असा प्रश्न पडत होता की, त्यांच्या बिकिनी फोटोचा परिणाम लग्नावर तर होणार नाही ना? शिवाय शर्मिला मन्सूर अली खान पतौडी यांच्यावर जीवापाड प्रेम करीत होत्या. त्यांना संपूर्ण आयुष्य त्यांच्याबरोबरच व्यतित करायचे होते. या भीतीपोटी शर्मिला यांनी नंतर एका निर्मात्याशी चर्चा करून रातोरात शहरातील सर्व पोस्टर काढण्यास सांगितले होते.