Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलांपेक्षा सून करीनावरच आहे जास्त विश्वास’, शर्मिला टागोर यांनीच सांगितले होते यामागचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 15:30 IST

२०१२ मध्ये करिना आणि सैफचे लग्न झाले. करिनासारखी सून पतौडी कुटुंबाला लाभल्याने सासू शर्मिला मात्र प्रचंड आनंदीत असतात. त्यामुळे सुनेचे कौतुक करण्यासाठी वेळ मिळताच तोंडभरुन तिचे कौतुक करताना दिसतात.  

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक लोकप्रिय जोडी म्हणजे बेबो करिना कपूर खान आणि सैफ अली खान. या दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री असल्याचे पाहायला मिळते. नेहमीच दोघे चर्चेत असतात. लग्न ठरल्यापासूनच करिनाचे नवाब कुटुंबातील प्रत्येक सदस्याबरोबर खूप चांगले नाते निर्माण झाले होते. सैफ अली खानच्या दोन्ही बहिणींबरोबर तर बेबो करिनाचे खूप चांगले ट्युनिंग निर्माण झाले होते. 

 

सासू शर्मिला यांच्यासह देखील करिनाचे खूप चांगले बॉन्डिंग होते. शर्मिला टागोरदेखील नेहमीच सून करिनाविषयी भरभरून बोलतान दिसतात.शर्मिला यांना सूनेच्या सगळ्याच गोष्टी आवडत असली तरी एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे त्यांना त्यांच्या मुलांपेक्षाही सूनेवर जास्त विश्वास असल्याचे त्या अभिमानाने सांगतात. 

शर्मिला यांनी सांगितले होते की, मुलं माझ्या एका मेसेजचा रिप्लाय त्यांना वेळ मिळेल तेव्हा देतात. मात्र सून करिना कधीच असे करत नाही. मेसेज असो किंवा फोन कॉल लगेचच त्याला उत्तर देते. माझ्या मुलांपेक्षा जास्त करिना माझ्या सतत संपर्कात असते. जेव्हा जेव्हा मी करिनाला भेटायला त्यांच्या घरी जाते तेव्हा मोठ्या प्रेमाने माझ्या आवडीचे जेवण बनवले जाते. खूप छान टेबल लावते. इतकेच काय तर स्वतःच्या हाताने जेवण वाढते हेच कपूर कुटुंबाचे वैशिष्ट्य मला सगळ्यात जास्त आवडते. 

सुख असो दुःख असो करिना प्रत्येक वेळी पतौडी कुटुंबासह उभी असते. नेहमीच आमच्यासाठी ती मोठा आधार बनली. २०११ मध्ये मंसूर अली खान यांचे निधन झाले. दुस-याच दिवशी तिचा वाढदिवस होता. मात्र करिना सगळं काही विसरुन आमच्यासोबत हॉस्पिटलमध्येच थांबली. पतौडी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ती आधार देत होती. 

मी स्वतः करिनाला पाहिले आहे. त्यावेळी तर सैफ आणि करिनाचे लग्नही झाले नव्हते. आमच्या कठिण काळात तिने मोठा धीर दिला. सगळ्यांची निट काळजी घेतली. २०१२ मध्ये करिना आणि सैफचे लग्न झाले.

करिनासारखी सून पतौडी कुटुंबाला लाभल्याने सासू शर्मिला मात्र प्रचंड आनंदीत असतात. त्यामुळे सुनेचे कौतुक करण्यासाठी वेळ मिळताच तोंडभरुन तिचे कौतुक करताना दिसतात.  

टॅग्स :करिना कपूरशर्मिला टागोर