शरमनची नवी अॅडल्ट फिल्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 09:27 IST
कॉमेडी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये शुभारंभ केलेल्या शरमन जोशीचा करिअरग्राफ अजुनही नीट स्थिरावलेला नाहीए.‘रंग दे बसंती’ आणि ‘थ्री इडियटस्’ यांसारख्या ...
शरमनची नवी अॅडल्ट फिल्म
कॉमेडी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये शुभारंभ केलेल्या शरमन जोशीचा करिअरग्राफ अजुनही नीट स्थिरावलेला नाहीए.‘रंग दे बसंती’ आणि ‘थ्री इडियटस्’ यांसारख्या सुपरडूपर हीट चित्रपटांतील अभिनयाचे कौतुक होऊनही त्याला सोलो लीड फिल्म मिळाली नाही.म्हणूनच की काय तो आता करिअरला टर्निंग पॉर्इंट देण्याच्या विचारात आहे. ‘हेट स्टोरी ३’ सारख्या प्रौढ चित्रपटातून काम करून त्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. आता आणखी एका अॅडल्ट फिल्ममध्ये तो काम करत असून येत्या मे महिन्यात त्याची शुटिंग सुरू होणार आहे. ‘हेट स्टारी ३’ दिग्दर्शक विशाल पांड्या या निनावी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार. फिल्ममध्ये इतर कोण असणार याबाबत अद्याप कोणताच खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, शरमनने आतापासूनच जिममध्ये आकर्षक पीळदार बॉडी बनविण्यासाठी व्यायाम सुरू केला आहे.तसेच विक्रम भटच्या आगामी ‘1920 लंडन’ या थ्रीलर चित्रपटातही शरमन झळकणार आहे. त्याची फिल्म निवड पाहता तो आता मसाला चित्रपटांकडे लक्ष देणार, असे स्पष्ट दिसतेय.