शंकर महादेवन बर्थ डे स्पेशल !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2017 11:04 IST
बॉलिवूडमध्ये आणि मराठी चित्रपटसृष्टीतले आघाडीचे नाव म्हणजे गायक आणि संगीतकार शंकर महादेवन. गाणं कोणत्या ही जॉनरच असो त्याला शंकरजीने ...
शंकर महादेवन बर्थ डे स्पेशल !
बॉलिवूडमध्ये आणि मराठी चित्रपटसृष्टीतले आघाडीचे नाव म्हणजे गायक आणि संगीतकार शंकर महादेवन. गाणं कोणत्या ही जॉनरच असो त्याला शंकरजीने आपला आवाजाने चाँद चांद लावले. मराठी भावसंगीतात स्वत:चा वेगळा ठसा शंकरजींनी उमटवला आहे. 4 वेळा शंकरजींना गायनासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. ‘कट्ट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाव्दारे त्यांनी अभिनयात पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या पंडीतजींच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झाले होते. अशा या गायक संगीतकार आणि अभिनेता यांनी आज वयाच्या 50व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कारकर्दीची घेतलेला हा आढावा. शंकर महादेवन यांचा जन्म 3 मार्च 1967साली चेंबूर मधल्या तमिळ कुटुंबामध्ये झाला. लहानपणापासूनच शंकरजींना गाण्याची आवड होती. लहान वयातच त्यांनी संगीताचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वीणा वादन सुरु केले. के.राजम आणि शंकरजींच्या मातोश्री ललिता व्यंकटरामन यांच्याकडे त्यांनी वीणावादनाचे शिक्षण घेतले. ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याकडे ही त्यांनी गायनाचे शिक्षण घेतले. याचबरोबर चेंबूरच्या ओएलपीएस शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंगमध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली. इंजीनिअरिंगचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी एक कंपनीत नोकरीसुद्धा केली. मात्र नोकरीत त्यांचे मन फार काळकाही रमले नाही. यानंतर 8 महिन्यांत त्यांनी नोकरी सोडून स्वत:ला संगीतात झोकून दिले. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्कींनी त्यांना कमांडर सीरिअलचा टायटल ट्रॅक गाण्यांची संधी दिली. . त्यांनी 1998 मध्ये ब्रीदलेस स अल्बमद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांच्या पहिल्या अल्बमला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे ते प्रकाशझोतात आले आणि यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. शंकरजींच्या ‘ब्रीदलेस’नंतर काही काळातच शंकर-एहसान-लॉय हे एकत्र आले. इथून पुढे संगीताचा एक नवीन अध्यायच सुरू झाला. त्यांनी संगीत दिलेल ‘सुनो गौर से दुनिया वालो’ हे गाणं आजही लोकांच्या ओठांवर रुळलेले आहे. उस्ताद आमीर खाँसाहेब हे शंकरजींची अत्यंत आवडते गायक आहेत. दिल चाहते ते मीतवा ही गाणी त्यांच्या करिअरला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेली. आज शंकर महादेवन यांचा मुलगा सिद्धार्थने ही गायनाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे.