Join us

शंकर-एहसान-लॉय करणार सामाजिक जागृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 17:08 IST

तंबाखूमुळे होणाऱया दुष्परिणामाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी कॅन्सर पेशंट्स अॅण्ड असोसिएशनने म्युझिक फॉर अ कॉज या शंकर-एहसान-लॉय यांच्या कार्यक्रमाचे आयोजन ...

तंबाखूमुळे होणाऱया दुष्परिणामाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी कॅन्सर पेशंट्स अॅण्ड असोसिएशनने म्युझिक फॉर अ कॉज या शंकर-एहसान-लॉय यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तुमचे आयुष्य जगा, धुम्रपान करून ते वाया घालवू नका हा संदेश या कार्यक्रमाद्वारे देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जवळजवळ २००० तरुण उपस्थित राहाणार आहेत. कॅन्सर पेशंट्स अॅण्ड असोसिएशनसोबत यासोबत हा कार्यक्रम करण्याचे या त्रिकूटाचे तिसरे वर्ष आहे. सामाजिक कार्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला पाहिजे असे या तिघांचेही म्हणणे आहे. या कार्यक्रमात इतर बॉलिवुड गायकही त्यांना साथ देणार आहेत.