Join us
Daily Top 2Weekly Top 5

शम्मी कपूर यांचा मुलगा वयाच्या ६७व्या वर्षी झाले ग्रॅज्युएट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 17:43 IST

बॉलिवूड अभिनेते शम्मी कपूर (Shammi Kapoor) यांचा मुलगा आदित्य राज कपूर (Aditya Raj Kapoor) हे वयाच्या ६७व्या वर्षी ग्रॅज्युएट झाले आहेत. आदित्य राज कपूर यांनी फिलॉसॉफीमध्ये पदवी घेतली आहे.

बॉलिवूड अभिनेते शम्मी कपूर  (Shammi Kapoor) यांचा मुलगा आदित्य राज कपूर (Aditya Raj Kapoor)  हे वयाच्या ६७व्या वर्षी ग्रॅज्युएट झाले आहेत. आदित्य राज कपूर यांनी फिलॉसॉफीमध्ये पदवी घेतली आहे. आदित्य हे बिझनसमॅन असून ते गोव्यात वास्तव्यास आहेत. त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले की, त्यांना शिक्षणाचे महत्त्व खूप उशीराने कळले आणि त्यासाठी त्यांची मुलगी तुलसीने त्यांना प्रोत्साहन दिले. मग त्यांनी शिक्षण घेतले.

आदित्य राज कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून तत्त्वज्ञान या विषयात  पदवी घेतली आहे. ते म्हणाले की, 'मला अभ्यासाची संधी मिळत होती पण मी त्याकडे पाहिले नाही. मला माझी चूक कळली पण ते पुरेसे नव्हते, तेव्हाच मला शिक्षणाचे महत्त्व कळले.आदित्य यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केला होता. या फोटोत त्यांच्या हातात सर्टिफिकेट दिसत आहेत. हा फोटो पाहून चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

माझी आई गीता बाली यांच्यासाठी मी केले आहे

ते म्हणाले की, 'दोन आठवड्यांपूर्वी मी  ५९.६७ टक्के गुणांसह उत्तीर्ण झालो आहे. मी फिलॉसॉफी ऑनर्समध्ये सेकंड क्लासने उत्तीर्ण झालो. इग्नूने खूप सहकार्य केले. गोव्यात ते रिजनल डायरेक्टर आहेत आणि त्यांनी खूप मदत केली. माझ्या या यशाने माझे कुटुंब खूप आनंदी आणि उत्साहित झालो. मी माझी आई गीता बाली यांच्यासाठी हे केले आहे. हा सर्व माझ्या गुरूंचा प्रभाव आहे. माझे गुरु - भोले बाबा.

'माणसाचा विचार' या विषयाने नेहमीच भुरळ घातली

आदित्य यांनी पुढे सांगितले की, त्यांनी  वयाच्या ६१ व्या वर्षी पुन्हा अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यांनी सांगितले की, 'गेली अनेक वर्षे जगण्याच्या माझ्या संघर्षात मला 'माणसाचा विचार' या विषयाने नेहमीच भुरळ घातली. माणूस जसा विचार करतो तसा विचार का करतो? त्याला काय विचार करायला लावते? हा आणि माझा आध्यात्मिक अनुभव या सर्व गोष्टींचा मी विचार केला.

टॅग्स :शम्मी कपूर