बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने (Nawazuddin Siddiqui) अलीकडे बॉलिवूड सेलिब्रिटींचा चांगलाच क्लास घेतला होता. कोरोनाकाळात मालदीवमधील सुट्टीचे फोटो शेअर करणा-या सेलिब्रिटींवर नवाज भडकला होता. लोकांना पोट भरण्यासाठी अन्न नाही आणि तुम्ही पैसे उधळत आहात, अरे जरा तरी लाज बाळगा, असे तो म्हणाला होता. पण कदाचित नवाजचा हा संताप त्याचा लहान भाऊ शमास नवाब सिद्दीकीला (Shamas Nawab Siddiqui) आवडला नाही. त्याने काय केले तर सोशल मीडियावर पोस्ट करत नवाजलाच सुनावले. (Shamas Nawab Siddiqui slams Nawazuddin Siddiqui )
काय म्हणालाशमास?
काय म्हणाला होता नवाज?बॉलिवूड हंगामा या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत नवाज सेलिब्रिटींवर बरसला होता. ‘देशातली स्थिती फार खडतर आहे. कोव्हिडच्या केसेस वाढतायत. लोकांना खायला अन्न मिळत नाहीय. देशाची स्थिती अशी असताना, काही कलाकार मालदिवला जाऊन तिथले फोटो पोस्ट करतायत. लोकांकडे खायला पैसे नाहीयत आणि तुम्ही पैसे उडवताय. अरे जरा तरी लाज बाळगा. ' हे सगळे कलाकार आपल्या सुट्टीचे फोटो पोस्ट करतायत. कारण त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाहीये. अभिनयावरही ते बोलत नाहीत. कारण यावर बोलले तर ते या सिस्टीममधून बाहेर पडतील. मालदिवचा तमाशा करून ठेवला आहे सगळ्यांनी. तिथे त्यांची पर्यटनादृष्टीने काय सोय आहे मला माहीत नाही. पण तुमची सुट्टी तुमच्यापुरती ठेवा. इकडे कोव्हिड पेशंट वाढतायत. थोडीतरी सहानुभूती दाखवा,’असे तो म्हणाला होतासध्या मी माझ्या बुधाना या गावी आहे. हेच माझे मालदिव आहे, असेही तो म्हणाला होता.