Join us
Daily Top 2Weekly Top 5

​स्टार स्क्रीन अवॉर्ड्स पुरस्कार सोहळ्यात शामक दावरने या चित्रपटासाठी पटकावला पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 13:30 IST

रंगीबेरंगी दिव्यांचा झगमगाट, रोषणाई, नृत्य आणि संगीताचा अनोखा मेळ आणि फिल्मी तारे या सर्वांचे एक अनोखं मेळ म्हणजे अवॉर्ड ...

रंगीबेरंगी दिव्यांचा झगमगाट, रोषणाई, नृत्य आणि संगीताचा अनोखा मेळ आणि फिल्मी तारे या सर्वांचे एक अनोखं मेळ म्हणजे अवॉर्ड सोहळा! अवॉर्ड सोहळ्यांमध्ये सिने ताऱ्यांना पुरस्काराच्या रूपाने आपल्या कामाची पावती मिळते आणि म्हणूनच सिनेअभिनेते वर्षभर या पुरस्काराची वाट बघत असतात. स्टार स्क्रीन अवॉर्ड्स पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यंदा पार पडलेल्या या स्टार स्क्रीन अवॉर्ड्स २०१७ च्या या दिमाखदार सोहळ्यात नृत्यदिग्दर्शक शामक दावरने सिनेमा जग्गा जासूस मधील उल्लू का पठ्ठा या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचा मान पटकावला आहे. शामक दावरला मिळालेल्या या यशाबद्दल तो प्रचंड खूश आहे. त्याला मिळालेल्या या यशाबद्दल तो सांगतो, स्टार स्क्रीन अवॉर्ड्सच्या यशाबद्दल मी खूप खूश आहे. जग्गा जासूस सिनेमाचे नृत्यदिग्दर्शन करणे हे माझ्यासाठी खूप खास होते. कारण या चित्रपटातील नृत्यशैली ही अन्य नृत्यापेक्षा खूप वेगळी आणि तितकीच मजेशीर आहे. मी दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि आमचे सिनेमॅटोग्राफर रवी सर यांचे मनापासून आभार मानतो. त्यांच्या कमालीच्या कल्पनेशैलीमुळे या गाण्याला 'चार चाँद' लागले. रणबीर आणि कतरीना या दोघांना मी खूप जवळचे मानतो आणि याच गोष्टीमुळे आमच्या तिघांमध्ये ताळमेळ बसला. त्यामुळेच त्या दोघांनी माझ्या मूव्हमेंट्स पटकन शिकल्या आणि या गाण्याला खूप चांगल्याप्रकारे सादर केले. उल्लू का पठ्ठा हे गाणे एका प्रवासादरम्यानचे गाणे आहे आणि या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन म्हणजे माझ्यासाठी जणू एक मेजवानीच होती. या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल आणि 'उल्लू का पठ्ठा' या गाण्यावर मनापासून प्रेम केलं यासाठी मी ज्युरी आणि प्रेक्षक वर्गाचे आभार मानतो.शामकने आजवर दिल तो पागल है, ताल, किस्ना, बंटी और बबली, धूम २, तारे जमीन पर, युवराज, रब ने बना दी जोडी, जग्गा जासूस यांसारख्या चित्रपटांतील गाणी कोरिओग्राफ केली आहेत. शामकला बॉलिवूडमधील सगळ्यात चांगल्या कोरिओग्राफर्स पैकी एक मानले जाते. Also Read : शामक दावरचे मराठीमध्ये पदार्पण