Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्यामक दावर म्हणतो, गोविंदा सारखा नर्तक नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2017 19:18 IST

बॉलिवूडमधील नृत्य दिग्दर्शक श्यामक दावर यांच्या अनुसार अभिनेता गोविंदासारखा दुसरा नर्तक नाही.एका बॉलिवूड अ‍ॅवॉर्ड कार्यक्रमाचे श्यामक दावरने नृत्य ...

बॉलिवूडमधील नृत्य दिग्दर्शक श्यामक दावर यांच्या अनुसार अभिनेता गोविंदासारखा दुसरा नर्तक नाही.एका बॉलिवूड अ‍ॅवॉर्ड कार्यक्रमाचे श्यामक दावरने नृत्य दिग्दर्शन केले होते. यामध्ये गोविंदाही सहभागी झाला होता. याबाबत बोलताना श्यामक दावर म्हणाला, गोविंदा रिहर्सलसाठी आला, त्याने गाण्यातील त्याच्या स्टेप्स पाहिल्या आणि म्हणाला, ‘नो प्रॉब्लेम! मी हे करू शकतो. त्यानंतर तो निघून गेला. त्यानंतर तो पुन्हा आला आणि त्याने हे अगदी सहजगत्या केले. जेंव्हा तुम्ही त्याला नृत्य करताना पाहता, त्यावेळी तुम्हाला असे वाटेल की गोविंदासारखा दुसरा नर्तक नाही.’तो केवळ नृत्यच करीत नाही तर त्याचे हावभावदेखील पाहण्यासारखे असतात. माधुरी दीक्षित ही हावभावासाठी प्रसिद्ध होती. गोविंदा हा सुद्धा हावभावांचा मास्टर आहे.या गाण्यात गोविंदासोबत रवीना टंडननेही सहभागी झाली होती. या दोघांनीही नृत्य करताना खूप धमाल केल. मला वाटते, त्यांनी स्टेजवर जादू केली.‘ असेही श्यामकने सांगितले.