कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता देशभर लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. आता मात्र लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली जात आहे. शिवाय अनलॉक-1सोबत देश हळूहळू पूर्वपदावर येतोय. येत्या काही दिवसांत फिल्म इंडस्ट्रीचे कामही सुरु होणार आहे. लॉकडाऊनच्या काळात फिल्म इंडस्ट्री ठप्प पडली होती. आता शूटींग सुरु होणार म्हटल्यावर एकीकडे फिल्म इंडस्ट्रीत आनंदाचे वातावरण आहे. पण दुसरीकडे अभिनेत्री श्रद्धा कपूरचे घरचे मात्र चिंतेत आहे. विशेषत: श्रद्धा कपूरचे पापा शक्ती कपूर कमालीचे चिंतीत आहे. काहीही झाले तरी सध्या तरी मी माझ्या मुलीला शूटींगची परवानगी देणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शूटींग सुरु झाल्यास परिस्थिती आणखी खराब होईल. मी माझ्या अनेक मित्रांनाही शूटींग न करण्याचा सल्ला दिला आहे. कारण बाहेर स्थिती खूप गंभीर आहे, असेही ते म्हणाले.शक्ती कपूर यांची काळजी वाजवी आहे. शेवटी श्रद्धा अभिनेत्री असली तरी सर्वप्रथम ती त्यांची मुलगी आहे. यामुळे मुलीचा जीव ते कुठल्याही स्थितीत धोक्यात घालू इच्छित नाही.