शक्ती कपूरच्या कडेवरील ही चिमुकली आहे तरी कोण?जी आज आहे बॉलिवूडची हसीना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 17:07 IST
बॉलिवूडचा क्राईम मास्टर गोगो अर्थात अभिनेता शक्ती कपूर यांनी आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात वेगळे स्थान मिळवलं आहे. शक्ती कपूर ...
शक्ती कपूरच्या कडेवरील ही चिमुकली आहे तरी कोण?जी आज आहे बॉलिवूडची हसीना
बॉलिवूडचा क्राईम मास्टर गोगो अर्थात अभिनेता शक्ती कपूर यांनी आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात वेगळे स्थान मिळवलं आहे. शक्ती कपूर यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारुन चित्रपटसृष्टीत अढळ स्थान मिळवलं आहे. शक्ती कपूर यांनी साकारलेल्या भूमिकांमध्ये खलनायकाच्या भूमिका विशेष गाजल्या. याशिवाय त्यांनी सहकलाकार म्हणून साकारलेल्या आणि विनोदी भूमिकाही तितक्याच रसिकांच्या पसंतीस पात्र ठरल्या. शक्ती कपूर यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये त्यांच्या कडेवर एक चिमुरडी आहे. ही चिमुरडी कोण हे वेगळं सांगण्याची गरज नाही. कारण तिचा चेहरा पाहून तिला तुम्ही ओळखलंच असणार नाही का ? अजूनही ही चिमुरडी कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर शक्ती कपूर यांच्या कडेवर असणारी ही गोंडस मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून बॉलिवूडची अभिनेत्री श्रद्धा कपूर आहे. श्रद्धा कपूर म्हणजेच शक्ती कपूर आणि शिवांगी कपूर यांची ही लेक. शक्ती कपूर यांच्यासह चिमुकल्या श्रद्धाचा लूक तुम्हाला तिच्या प्रेमात पाडेल. वडिल शक्ती कपूर पंजाबी आणि आई शिवांगी मराठी असल्यामुळे श्रद्धावर बालपणापासून दोन्ही संस्कार झाले आहेत. चिमुकल्या श्रद्धाच्या बालपणीच्या फोटोतील अदा या जणू अभिनेत्रीप्रमाणेच असल्याचे दिसते. बोलके डोळे, स्टाईल याची झलक या फोटोत स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच की काय बालपणापासूनच ती चित्रपटसृष्टीशी जोडली गेलेली आहे. लहानपणी ती कायमच आपल्या वडिलांसोबत म्हणजेच शक्ती कपूर यांच्याबरोबर सेटवर जात असे. त्यांना पाहून त्यांचे डायलॉग बोलण्याचा प्रयत्न करत असे. शिवाय आरशासमोर उभी राहून ती डान्स करत असे. त्यामुळेच की काय आज एक अभिनेत्री, गायिका, गीतकार आणि डिझायनर म्हणून श्रद्धा कपूर हिने स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. आशिकी 2, एक व्हिलन, एबीसीडी 2, बागी, रॉक ऑन 2 अशा तिच्या विविध सिनेमातील भूमिका रसिकांना भावल्या आहेत. आजच्या पीढीची नायिका म्हणून श्रद्धाने तरुणाईच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. त्यामुळेच तिचा हा बालपणीचा फोटो तुम्हाला नक्कीच आवडेल. Also Read:श्रद्धा कपूरचा ‘हसीना पारकर’ का लांबतोय? वाचा खरे कारण!