Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरूखची लेक सुहाना खानचा तिच्या बेस्टीसोबतचा फोटो होतोय व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 20:59 IST

शाहरूख खानची लेक सुहाना खान सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते, आता तिने एक फोटो शेअर केला असून, त्यामध्ये ती तिच्या बेस्टीसोबत बघावयास मिळत आहे.

बॉलिवूडचा किंग शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खान नेहमीच तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते. सुहानाने कोणाताही फोटो सोशल अकाउंट शेअर केला तरी तो लक्षवेधी ठरतो. आउटिंग, पार्टीचे फोटोज् ती कायम सोशल मीडियावर शेअर करीत असते. आता पुन्हा एकदा सुहानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये ती तिच्या बेस्टीसोबत बघावयास मिळत आहे. सुहानाचा हा फोटो तिच्या चाहत्यांकडून प्रचंड पसंत केला जात असून, त्यामध्ये सुहानाचा अंदाज बघण्यासारखा आहे. सुहानाच्या चेहºयावरील स्माइल सध्या नेटकºयांना भुरळ पाडताना दिसत आहे. सुहानाचा हा फोटो एका पार्टीतील आहे. अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर तिची खूप चांगली मैत्रिण आहे. या दोघींना बºयाचदा एकत्र बघण्यात आले. या पार्टीत जेव्हा या दोघी एकत्र आल्या, तेव्हा त्यांनी अतिशय हटके अंदाजात फोटोशूट केले. फोटो काढताना शनाया आणि सुहाना दोघींच्याही गालावर स्माइल असून, त्यांचा हा अंदाज चाहत्यांना पसंत येत आहे. कारण दोघींचा हा फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे.  दरम्यान, यापूर्वीही सुहानाचे कित्येक फोटोज् व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वीचा तिचा किचनमधील एक फोटो समोर आला होता. फोटोमध्ये ती कुकिंग करताना दिसत होती. वास्तविक तिचा हा फोटो खूप जुना होता, मात्र अशातही चाहत्यांनी त्यास पसंती दिली. त्याचबरोबर तिचे ट्रेडिशनल लूकमधील काही फोटोदेखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. या फोटोमध्ये सुहाना गुलाबी रंगाच्या डिझायनर लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत होती. तिचा हा लेहंगा सीमा खानने डिझाइन केला होता.