Join us

शाहरुख खानचा बर्थडे होणार स्पेशल, चाहत्यांना मिळणार मोठे गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 12:00 IST

बहुप्रतिक्षित 'डंकी' चित्रपटाचा टीझर त्याच्या शाहरुखच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 2 नोव्हेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

किंग खान शाहरुख खान यावर्षी 58 वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्यांच्या बहुप्रतिक्षित 'डंकी' चित्रपटाचा टीझर त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 2 नोव्हेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत. संपूर्ण बॉलिवूड त्याच्या या चित्रपटाची वाट पाहत आहे. राजकुमार हिराणी दिग्दर्शित 'डंकी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार अशी सगळ्यांना अपेक्षा आहे.

सॅकल्निकनुसार, शाहरुखचा मोस्ट अवेटेड ‘डंकी’चा टीझर त्याच्या वाढदिवशी अर्थात २ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. 'डंकी' हा चित्रपट 22 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.  हा एक कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे. याआधी 7 सप्टेंबरला शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर #DunkiTeaser अशी जोरदार चर्चा होतेय.

शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त नेटफ्लिक्सनेही आणखी एक सरप्राईज प्लॅन केले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने 'जवान' चे ओटीटी अधिकार विकत घेतले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुखाचा ब्लॉकबास्टर जवान हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 2 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.  

टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूडसिनेमा