टॉलिवूड स्टार देवसोबत दिसणार शाहरुख
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 14:33 IST
पश्चिम बंगालचे पर्यटन या विषयावर एक जाहिरात फिल्म तयार करण्यात येत आहे. या फिल्मचे टॉलिवूड सुपरस्टार देव आणि शाहरुख ...
टॉलिवूड स्टार देवसोबत दिसणार शाहरुख
पश्चिम बंगालचे पर्यटन या विषयावर एक जाहिरात फिल्म तयार करण्यात येत आहे. या फिल्मचे टॉलिवूड सुपरस्टार देव आणि शाहरुख खान याने प्रमोशन केले आहे. पश्चिम बंगालमधील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी ही फिल्म तयार करण्यात येत असून, बंगालमधील आकर्षक स्थळांची माहिती यात देण्यात आली आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात ही फिल्म प्रदर्शित होणार असून तिच्या प्रमोशनसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.द स्वीटेस्ट टुरिस्ट डेस्टिनेशन असे या फिल्मचे नाव आहे. पश्चिम बंगाल पर्यटन महामंडळाने यासाठी ८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यासाठी एका नामांकित एजंन्सीला ७५ लाख रुपये देण्यात आले आहेत. दार्जंलिंग, बोलपूर आणि समुद्र परिसरातील पर्यटन क्षेत्रांची माहिती यात असल्याचे पर्यटन विकास मंत्री ब्रत्या बसू यांनी म्हटले आहे. शाहरूख खान याचा व्हॉलिंटीअर असून, यासाठी आपण कोणतेही शुल्क घेणार नसल्याचे त्याने म्हटलेआहे.मात्र, अभिनेत्यांना मानधन देण्यासाठी आम्ही तरतूद केल्याचे बसू यांनी सांगितले.