Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुख म्हणतो, अंतर्मनाचा आवाज ऐका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 15:07 IST

शाहरुख म्हणतो, अंतर्मनाचा आवाज ऐकाधीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या ग्रॅज्युएशन कार्यक्रमात अभिनेता शाहरुख खानने प्रमुख पाहुणा म्हणून बोलताना २३ मिनिटांच्या भाषणात आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकण्याचा सल्ला दिला. आपल्या भाषणात शाहरुखने शालेय जीवनातील किस्से सांगितले. शाळेत आपण कसे खोडकर होतो हे सांगताना शाहरुख स्टाईलने काही गोष्टीही सांगितल्या. आपल्या भाषणात शाहरुखने मुलांना भरपूर हसविले.

धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या ग्रॅज्युएशन कार्यक्रमात अभिनेता शाहरुख खानने प्रमुख पाहुणा म्हणून बोलताना २३ मिनिटांच्या भाषणात आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकण्याचा सल्ला दिला. आपल्या भाषणात शाहरुखने शालेय जीवनातील किस्से सांगितले. शाळेत आपण कसे खोडकर होतो हे सांगताना शाहरुख स्टाईलने काही गोष्टीही सांगितल्या. आपल्या भाषणात शाहरुखने मुलांना भरपूर हसविले. शाहरुखच्या भाषणाचा काही अंशमुक्त रहा. स्वत:पासून मुक्त रहा. आपल्या आतील आवाज ओळखा. तुम्ही कोण आहात आणि तुम्ही काय होऊ इच्छिता हे कोणालाही सांगू नका. तुमच्या आयुष्यातील ही काही वर्षे आहेत, ज्यावेळी तुम्ही केलेल्या चुका माफ होतील. तुम्ही असे केल्यास, तुमच्या स्वप्नापर्यंत तुम्ही पोहोचाल.एकवेळ अशी येईल, ज्यावेळी एकही गोष्ट तुमच्या मनासारखी होणार नाही. त्यावेळी रागाला जाऊ नका. छोटे छोटे पेच तुम्ही सोडवू शकता.पुढे जाताना काही वेळा तुम्हाला काही पाऊले मागे जावे लागेल. असे करताना कोणतीही चूक नाही. छोट्या गोष्टींसाठी धावताना काही वेळा तुम्हाला दु:ख पोहोचेल. मात्र मोठ्या शर्यतीसाठी तुम्हाला याचा उपयोग होईल.तुम्हाला ज्यावेळी संधी मिळेल, त्यावेळी स्वत:वर हसा. तुम्ही स्वत:ला गांभीर्याने घेण्यास यशस्वी ठरला नाही तर कोणताही प्रश्न कितीही मोठा अथवा लहान असो, तुम्हाला खाली खेचणारी आयुष्याची उर्जा कमी कराल. तुमचा मोठा भाऊ अथवा बहीण तुम्हाला ज्या गोष्टी घरी करण्यास मनाई करतात, त्या करा म्हणून मी सांगण्यास आलो आहे. मी त्यांच्याप्रमाणेच आहे, परंतू थोडा मोठाय. तुमच्या आई-वडिलांच्या म्हणण्याचा अर्थ ओळखा. या ठिकाणी मी जे काही सांगतो आहे, ते अनेक वर्षानंतर तुमच्या लक्षात येतील.कोणत्याही प्रश्नावर मोकळे व्हा. तुम्हाला कदाचित ही सर्वात सुरक्षित जागा सोडताना वाईट वाटेल, परंतू बाहेर पडताना तुमच्यासमोर काय वाढून ठेवले आहे, याची कल्पना येईल.