Join us
Daily Top 2Weekly Top 5

​शाहरूख म्हणतो, मुझसे सयाना कोई नहीं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 17:26 IST

मुझसे सयाना दुनियाभर में कोई नहीं, असे किंगखान शाहरूख खान याचे ठाम मत आहे. त्याचा मुलगा आर्यनही त्याच्याइतका ‘शहाणा’ ...

मुझसे सयाना दुनियाभर में कोई नहीं, असे किंगखान शाहरूख खान याचे ठाम मत आहे. त्याचा मुलगा आर्यनही त्याच्याइतका ‘शहाणा’ नाही, असे किंगखान मानतो. शाहरूख जे बोलतो, ते अगदी बेधडक बोलतो. अलीकडे मीडियाने शाहरूखला एक प्रश्न केला. तो म्हणजे, टीनेजमध्ये तो अधिक शहाणा होता की त्याचा मोठा मुलगा आर्यन अधिक शहाणा आहे. यावर शाहरूखने क्षणाचाही वेळ न दवडता, उत्तर दिले. ते म्हणजे, ‘मुझसे सयाना कोई नहीं है और शायद मुझसे ज्यादा बेहतर दिखने वाला भी कोई नहीं है..’ आार्यन माझ्यापेक्षा चांगले कपडे घालतो. कारण तो माझेच कपडे चोरतो. पण असे असूनही तो माझ्याइतका शहाणा नाही. तीन वर्षांचा अबरामही माझ्यापेक्षा शहाणा नाही. माझ्या कुटुंबात व कुटुंबाच्या बाहेर माझ्यापेक्षा ‘सयाना’ कोई नही. मी खूप कूल आहे, असे तो म्हणाला.