Join us
Daily Top 2Weekly Top 5

देवानंदशी मिळतीजुळती शाहरूख करणार भूमिका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 10:55 IST

 शाहरूख खान आत्तापर्यंत दिसला नाही अशा वेशभूषेत तो त्याच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. त्याचा याअगोदरचा चित्रपट ‘फॅन’ने चाहते आणि ...

 शाहरूख खान आत्तापर्यंत दिसला नाही अशा वेशभूषेत तो त्याच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. त्याचा याअगोदरचा चित्रपट ‘फॅन’ने चाहते आणि समीक्षकांना अक्षरश: भारावून टाकले.तसेच तो त्याचा आगामी चित्रपट ‘रईस’ मध्ये दारूची तस्करी करणाºया व्यक्तीची भूमिका करणार आहे. शाहरूखने नुकतेच आलिया भट्टसोबत गौरी शिंदे यांच्या आगामी चित्रपटाची शूटींग संपवली आहे.तो दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा आगामी चित्रपटामध्ये अनुष्का शर्मासोबत दिसणार आहे.  या चित्रपटातील त्याची भूमिका ‘गाईड’ मधील देवानंद सारखी असणार आहे. तो एका टुरिस्ट गाईडच्या भूमिकेत दिसेल. त्याच्या भूमिकेचे खुप रूपे आहेत. त्याची तत्त्वे आणि नियम त्याचे आयुष्य सर्वअर्थाने बदलतात.