Join us

शाहरूखने सुरू केली ‘प्रेग’ मध्ये शूटींग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2016 11:46 IST

प्रेगच्या रस्त्यांवर फिरतांना तो दिसतो आहे. सोशल मीडियावर काही व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.

 शाहरूख खानने अखेर दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या आगामी चित्रपटासाठीची शूटींग ‘प्रेग’ येथे सुरू केली आहे. तो यात पंजाबी टूरिस्ट गाईडची भूमिका करताना दिसतोय.प्रेगच्या रस्त्यांवर फिरतांना तो दिसतो आहे. सोशल मीडियावर काही व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. ज्यातून शाहरूखच्या चाहत्यांना शाहरूखला पाहण्याची संधी मिळणार आहे.सीनचे त्यांनी काही इंटरेस्टिंग व्हिडीओ देखील शूट केले आहेत. एका फोटोत इम्तियाज किंग खानला सीन समजावतांना देखील दिसत आहे. यात अनुष्का शर्मा शाहरूख खानसोबत दिसणार आहे. ती गुजराती मुलीची भूमिका साकारणार आहे.