Join us

​शाहरूख खानची पोलखोल! इंग्रजीत मिळाले केवळ ५१ गुण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2017 12:40 IST

लक्ष्य स्पष्ट आहे, त्यासाठी जीवतोड मेहनत घेण्याची तयारी आहे तर यश तुमचेच. याचे जिवंत उदाहरण म्हणजे अभिनेता शाहरूख खान. ...

लक्ष्य स्पष्ट आहे, त्यासाठी जीवतोड मेहनत घेण्याची तयारी आहे तर यश तुमचेच. याचे जिवंत उदाहरण म्हणजे अभिनेता शाहरूख खान. होय, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी पुस्तकाचा किडा होणे किंवा पैकीच्या पैकी गुण मिळवणे आवश्यक नाही. यशासाठी केवळ गरजेचे आहे ते ध्येय आणि या ध्येयपूर्तीसाठी झपाटलेले मन. या दोन गोष्टी तुमच्याजवळ आहेत तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. आम्ही हे यासाठी बोलतोय, कारण आमच्याकडे शाहरूखच्या एका अ‍ॅडमिशन फॉर्मचा फोटो आहे. काल पासून सोशल मीडियावर दिल्लीच्या हंसराज कॉलेजच्या एका अ‍ॅडमिशन फॉर्मचा फोटो व्हायरल झाला आहे.हा अ‍ॅडमिशन फॉर्म आहे किंगखान शाहरूख खान याचा. शाहरूख बीए करत असतानाचा हा फॉर्म आहे. काही विद्यार्थ्यांद्वारे चालवल्या जाणा-या एका वेबसाईटने हा फोटो शेअर केला आहे. या अ‍ॅडमिशन फॉर्ममध्ये स्पष्ट दिसतेय, ती एकच गोष्ट. होय, शाहरूखला इंग्रजी विषयात केवळ ५१ गुण मिळाले होते. शाहरूख इंग्रजीत जरासा कमजोर होता, असाच कुणीही याचा अर्थ काढेल. पण असे नाहीय. प्रत्यक्षात तर शाहरूखचे इंग्रजी व हिंदी या दोन्ही भाषेवर जबरदस्त प्रभुत्व आहे. तरिही शाहरूखला या विषयात जेमतेम ५१ मार्क्स मिळावेत, याचा खरा अर्थ काढायचा झाल्यास एकच निघतो. तो म्हणजे, तुम्हाला तुमचा मार्ग गाठायचे ठरवले तर तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही. शाहरूख निश्चितपणे याचे मोठे उदाहरण आहे. शाहरूखच्या तमाम चाहत्यांनी त्याच्याकडून हे शिकण्यासारखे आहे. अलीकडे ‘टेड टॉक्स २०१७’मध्ये शाहरूखने मंत्रमुग्ध करणारे भाषण केले होते.