Join us

​शाहरूख खानच्या डोक्यात नवा बिझनेस प्लान; काढायचीय ‘ रेस्तरां चेन ’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2017 14:38 IST

शाहरूख खानचे टॅलेन्ट कुणापासूनही लपून राहिलेले नाही. केवळ अ‍ॅक्टिंगच नाही तर आपले हे टॅलेन्ट शाहरूखने अनेक पद्धतीने सिद्ध केले ...

शाहरूख खानचे टॅलेन्ट कुणापासूनही लपून राहिलेले नाही. केवळ अ‍ॅक्टिंगच नाही तर आपले हे टॅलेन्ट शाहरूखने अनेक पद्धतीने सिद्ध केले आहे. रेड चिली प्रॉडक्शन हाऊस, आयपीएलमध्ये टीमची मालकी असे सगळे शाहरख करतोय.  शाहरूखचे प्रॉडक्शन हाऊस जोरात सुरु आहे. त्याची आयपीएल टीमही फॉर्ममध्ये आहे. आता शाहरूख आपला बिझनेस आणखी वाढवू इच्छितो आहे. होय, गेस करू शकता? शाहरूखच्या डोक्यात कुठला बिझनेस असेल? तर आता शाहरूख हॉटेल व्यवसायात उतरू इच्छितो आहे. अलीकडे एका मुलाखतीत शाहरूखने त्याची ही इच्छा बोलून दाखवली. माझी एक रेस्तरां चेन असावी, हे माझे स्वप्न आहे. मी मुलींसारखा बोलतोय, असे  काहींना  वाटेल. पण हे खरे आहे, असे तो म्हणाला. यावेळी बोलताना शाहरूखने आणखी एक आतली बात सांगितली. होय, रेड चिली या नावामागची दूरदृष्टी त्याने सांगितली. मी माझ्या प्रॉडक्शनचे नाव रेड चिली, याचसाठी ठेवले होते की, प्रॉडक््शन हाऊस चालले नाही तर रेड चिली रेस्टॉरंट पक्के चालेल. मला कुकींग प्रचंड आवडते आणि म्हणून मला या व्यवसायात उतरायचे आहे, असे तो म्हणाला. एकंदर काय तर शाहरूखचा निर्धार पक्का आहे. त्यामुळे येत्या काळात शहराशहरात रेड चिली रेस्टॉरंट दिसलीत तर आश्चर्य वाटायला नको.ALSO READ : ​शाहरूख खानच्या घरी ‘सूपरवूमन’ घेणार पाहुणचार!सध्या शाहरूखचे सगळे लक्ष आयपीएलवर लागले आहे. कारण शाहरूखच्या मालकीची क्रिकेट टीम आयपीएलमध्ये खेळतेय. सोबतच शाहरूख इम्तियाज अलीच्या चित्रपटातही बिझी आहे. या चित्रपटात शाहरूख अनुष्का शर्मासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. सध्या पंजाबमध्ये या चित्रपटाचे शूटींग सुरू आहे. यानंतर शाहरूख आनंद एल राय यांच्या चित्रपटात व्यस्त होणार आहे.