Join us
Daily Top 2Weekly Top 5

नूडल्स बनविताना दिसली शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना, फोटो व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 19:00 IST

शाहरुखची लाडकी लेक सुहाना सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. तिचा एक जुना फोटो सध्या व्हायरल होत आहे. वाचा सविस्तर!

बॉलिवूड किंग शाहरुख खानचा एक जुना फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये सुहाना चक्क नूडल्स बनविताना दिसत आहे. हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा सुहाना मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत होती. सुहानाचा हा फोटो बघून अनेकांना त्यांच्या शालेय जीवनाची आठवण होईल. कारण शाळेत जाण्यासाठी जेव्हा वेळ कमी असायचा तेव्हा झटपट नूडल्स बनविण्याचा अनेकजण मार्ग स्वीकारायचे. सुहाना सध्या विदेशात शिक्षण घेत आहे. दरम्यान, सुहानाचा हा जुना फोटो तिच्या एका फॅन क्लबने सोशल मीडियावर शेअर केला आहे. सुहानाचा हा फोटो तिच्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंत केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच डॅडी शाहरुख खानने म्हटले होते की, जेव्हा आर्यन आणि सुहानाच्या शाळा-कॉलेजच्या सुट्या संपतात तेव्हा मला सर्वात जास्त दु:ख होते. शाहरुखचा मोठा मुलगा आर्यन याच्याविषयी सांगायचे झाल्यास, तो १९ वर्षांचा झाला असून, सध्या कॅलिफोर्नियात फिल्ममेकिंगचे शिक्षण घेत आहे.  सध्या सुहाना सोशल मीडियावर प्रचंड चर्चिली जात आहे. ती नेमहीच कुठल्या ना कुठल्या इव्हेंटमध्ये अतिशय हटके आउटफिटमध्ये बघावयास मिळते. काही दिवसांपूर्वी ती दिल्ली येथील तिच्या नातेवाइकाच्या लग्नात सहभागी झाली होती. लग्नसमारंभातील सुहानाचे फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. फोटोमध्ये सुहानाचा अंदाज बघण्यासारखा होता. ती खूपच सुंदर दिसत होती. सुहानाची सध्याची एकूण वाटचाल पाहता ती लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करेल असेच चित्र दिसत आहे.