Join us

शाहरुख खान या ठिकाणी जाऊन सेलिब्रेट करणार उद्या आपला वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 17:28 IST

उद्या बॉलिवूडता बादशाह शाहरुख खान 52व्या वर्षात पदार्पण करणार आहे. आपला लाडका कलाकार कुठे जाऊन आपला वाढदिवस साजरा करणार ...

उद्या बॉलिवूडता बादशाह शाहरुख खान 52व्या वर्षात पदार्पण करणार आहे. आपला लाडका कलाकार कुठे जाऊन आपला वाढदिवस साजरा करणार याची उत्सुकता तर नक्कीच त्याच्या फॅन्सना लागली असेल यात काही शंका नाही. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत किंग खान कुठे जाऊन आपला वाढदिवस सेलिब्रेट करणार आहे ते.  शाहरुखची पत्नी गौरी खान आपल्या नवऱ्याचा वाढदिवस स्पेशल बनवण्यासाठी काही खास प्लान करते आहे. गौरी शाहरुखच्या बर्थ डेच्या तयारीला लागली आहे. शाहरुखच्या बर्थ डेच्या एक दिवस आधीच गौरी अलिबागला रवाना झाली आहे. शाहरुख आपल्या खास पार्ट्ंयाचे आयोजन अलिबागलाच करतो. गेल्यावर्षी मात्र शाहरुखने आपला वाढदिवस मित्र परिवार आणि मीडियासोबत सेलिब्रेट केला होता. मात्र या वर्षी शाहरुख खान आपला वाढदिवस कुटुंबीय आणि खास मित्रसांसोबत साजरा करण्यासाठी अलिबागला जाणार आहे. कदाचित याच्या तयारीसाठी गौरी खान एक दिवस आधी अलिबागला गेली असावी.  शाहरुख खान आणि गौरी खान आज बॉलिवूडमधील हॅप्पी कपलपैकी एक आहेत. लग्नाला २६ वर्षं उलटूनदेखील त्यांच्यातील प्रेम तसुभरही कमी झालेले नाही. वयाच्या 52 व्या वर्षीसुद्धा शाहरुख खान आजच्या आघाडीच्या अभिनेत्यांना टक्कर देताना दिसतो. त्याच्या चेहऱ्याकडे बघून त्याच्या वयाचा अंदाज लावणे शक्य होत नाही. शाहरुखने छोट्या पडद्यावरुन आपल्या करिअराल सुरुवात केली. दिल दरिया, फौजी, सर्कस यासारख्या मालिकांमध्ये तो झळकला होता. दीवाना या चित्रपटातून त्यांने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याच हा चित्रपट सुपरहिट ठरला यानंतर शाहरुखने मागे वळून कधीच बघितले नाही. दिवाना, बाजीगर, डर, कभी हां कभी ना, करण-अर्जुन, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, दिल तो पागल है, कुछ कुछ होता है सारखे हिट चित्रपट त्यांने बॉलिवूडला दिले. काही महिन्यांपूर्वी अनुष्का शर्मासोबत आलेला जब हॅरी मेट सेजल चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. सध्या तो आनंद एल राय यांच्या आगामी चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. यात त्याच्यासोबत कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा झळकणार असल्याची चर्चा आहे.   ALSO READ :  ​‘डॉन’च्या शूटिंगदरम्यान शाहरुख खानच्या मनात दुसºयांदा लग्न करण्याचा आला होता विचार!