Join us

नाशिकची बातच न्यारी!! नाशिककरांच्या 'या' कृतीची शाहरुखने घेतली दखल; जाहीरपणे मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 16:09 IST

Shahrukh khan: 'जवान'च्या प्रदर्शनाची तारीख जवळ येऊ लागली आहे. त्यामुळे शाहरुख सातत्याने चाहत्यांशी संवाद साधत आहे.

बॉलिवूड किंग खान (shahrukh khan) याचा 'जवान' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. तेव्हापासून या सिनेमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी या सिनेमाचे मोठमोठे पोस्टर्स लागले आहेत. तर, काही ठिकाणी सिनेमाच्या अॅडव्हान्स तिकीटांची बुकिंग सुरु झाली आहे. त्यामुळे प्रेक्षक करत असलेलं हे प्रेम पाहून शाहरुख खान चांगलाच भारावला आहे.  इतकंच नाही तर तो शक्य होईल त्याप्रमाणे चाहत्यांचे आभार मानत आहे. यात त्याने नुकतेच नाशिककरांचे आभार मानले आहेत.

'जवान'च्या प्रदर्शनाची तारीख जवळ येऊ लागली आहे. त्यामुळे शाहरुख सातत्याने चाहत्यांशी संवाद साधत आहे. यात नुकतंच त्याने ट्विटरवर ‘आस्क एसआरके’ (AskSRK) हे सेशन घेतलं. त्यावेळी त्याने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. विशेष म्हणजे यावेळी नाशिकच्या लोकांनी त्याच्यावर दाखवलेलं प्रेम पाहून तो भारावून गेला आहे.

अनेक ठिकाणी 'जवान'च्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. त्यामुळे देशभरातून शाहरुखचे चाहते त्याला तुफान प्रतिसाद देत आहेत. यामध्येच नाशिकमधील एका त्याच्या फॅन क्लबने मोठ्या संख्येने जवानचं अॅडव्हान्स बुकिंग केलं आहे. यावेळी या फॅन क्लबने अॅडव्हान्स बुकिंगचा एक स्क्रीनशॉट शाहरुखला टॅग करत शेअर केला. त्यामुळे आपल्यावर प्रेम करणाऱ्या या चाहत्यांचे शाहरुखने आभार मानले आहेत.  दरम्यान, शाहरुखने ट्विटरवर हा स्क्रीनशॉट शेअर करत 'थॅक्यू नाशिक' असं म्हटलं आहे. शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा येत्या ७ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :शाहरुख खाननाशिकसिनेमाबॉलिवूडसेलिब्रिटी