कोरोनामुळे जगभर भीतीचे आणि दहशतीचे वातावरण आहे. पण अशातही काही जण आपल्यातील भन्नाट कल्पनाशक्तीचे दर्शन घडवत सकारात्मक संदेश देत आहेत. आता कोरोना सॉन्गचेच घ्या. बॉलिवूड गाण्यांवरच्या कोरोना व्हर्जननी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. आता आणखी एक ‘कोरोना’ व्हर्जन सोशल मीडियावर व्हायरल होतेय. शाहरुख खानच्या ‘चलते चलते’ सिनेमातील ‘सुनो ना सुनो ना’ गाण्यावरचे हे कोरोना साँग एकदम भन्नाट आहे. तेजस गंभीर नावाच्या एका मुलाने हे गाणे गायले असून त्याला म्युझिक सुद्धा त्यानेच दिले आहे. 2003 मध्ये रिलीज ‘चलते चलते’ या चित्रपटातील ‘सुनो ना सुनो ना सुन लो ना’च्या तालावर त्याने ‘कोरोना कोरोना कोरो..ना... इतना ना परेशा मत करो ना,’ असे गाणे बनवले आहे.
विशेष म्हणजे, या गाण्याला तेजसने कोरोना आणि मागच्या काही दिवसांपासून धार्मिक मुद्द्यांवरुन देशात सुरू असलेल्या वादाशी जोडले आहे. तेजसने त्याच्या फेसबुक अकाउंटवर हे गाणे शेअर केले आणि बघता बघता ते व्हायरल झाले.‘देशातल्या सध्याच्या परिस्थितीवर काही ओळी लिहिल्या आहेत. केवळ मनोरंजन हाच या मागचा उद्देश आहे. स्वत:ची काळजी घ्या आणि जात किंवा धमार्चा विचार न करता लोकांच्या वाईट काळात त्यांची मदत करा. देव सर्वांचं रक्षण करो. हे मूळ गीत ‘सुनो ना सुनो ना...’ अभिजित भट्टचार्य यांनी गायले आहे. तर निर्मिती टी-सीरिजची आहे. गाण्याच्या कॉपीराइटचे उल्लंघन करण्याचा माझा कोणताही हेतू नाही’असे त्याने हे गाणे शेअर करताना त्याने म्हटले आहे.