Join us
Daily Top 2Weekly Top 5

वयाचा आकडा फक्त ११ वर्ष, शाहरुखच्या धाकट्या लेकाची लाखोंची कमाई, नेमकं करतोय काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 15:26 IST

शाहरुख खानचा धाकटा मुलगा अबरामही आता लाखांत कमावू लागला आहे.

शाहरुख खानने आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला असून आज त्याला बॉलिवूडचा बादशाह म्हटले जाते. तो कोणत्या ना कोणत्या कारणाने कायम चर्चेत असतो. त्याची मुलंही कायम चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. शाहरुख खान हा तीन मुलांचा बाप आहे.  त्याची तीन मुलंही खूप हुशार असून यशाच्या पायऱ्या चढत आहेत. त्याचा मोठा मुलगा आर्यन खान हा कपड्यांच्या ब्रँडचा मालक आहे, तर त्याची मुलगी सुहाना अभिनेत्री बनली आहे. शाहरुख खानचा धाकटा मुलगा अबरामही आता लाखांत कमावू लागला आहे.

अबरामची कमाई त्याच्या वयापेक्षा जास्त आहे. शाहरुख खानचा धाकटा मुलगा वयाच्या 11 व्या वर्षी लाखोंची कमाई करतोय. नुकतंच अबरामने 'मुफासा द लायन किंग'मध्ये बेबी मुफासाच्या भूमिकेसाठी डबिंग केलं आहे. विशेष म्हणजे केवळ अबरामच नाही तर शाहरुख खाननेच मुफासाच्या व्यक्तिरेखेसाठी आवाज दिला आहे आणि त्याच्या मोठ्या मुलाने चित्रपटातील सिम्बाच्या व्यक्तिरेखेसाठी डबिंग केलं आहे. बेबी मुफासाच्या डबिंग करून अबराने 15 लाख रुपये कमावले आहेत. छोट्याश्या अबरामची कमाई शाहरुख खान आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबासाठी खूप खास आहे.

 

अबराम हा शाहरुखचा सर्वांत लहान लेक आहे. सर्वांत लहान असल्याने अबरामवर शाहरुखचा विशेष जीव आहे. अबराम खान याचा जन्म 27 मे 2013 मध्ये रोगेसीच्या मदतीने झाला होता. अनेक ठिकाणी अबराम वडील शाहरुख खान याच्यासोबत दिसतो. तर सोशल मीडियावर अबराम याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर अबराम याचे अनेक फॅनपेज आहेत.  विशेष म्हणजे अबराम याने बॉलिवूड डेब्यूदेखील केलेला आहे. अबराम हा हॅपी न्यू ईयर या चित्रपटात झळकला आहे.  

टॅग्स :शाहरुख खानआर्यन खानसुहाना खान