गेली कित्येक दिवसांपासून संजय लीला भंसाळी आणि शाहरुख खान पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. ‘पद्मावती’नंतर भंसाळी प्रसिद्ध गीतकार साहिर लुधियानवी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट दिग्दर्शित करणार असून त्यामध्ये शाहरुख प्रमुख भूमिकेत असेल.
मात्र कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्यामुळे या प्रोजेक्टविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. अखेर प्रथमच भाष्य करताना शाहरुखने सांगितले की, ‘मला साहिर लुधियानवी बायोपिकची पटकथा खूप आवडली आहे. मात्र सध्या यापेक्षा काही सांगणे योग्य ठरणार नाही. कारण अद्याप काहीच निश्चित झालेले नाही.’
‘रईस’निमित्त मीडियाशी चर्चा करताना तो म्हणाला की, ‘मी जेव्हा साहिर लुधियानवी आणि त्यांची प्रेयसी अमृता प्रितम यांच्या प्रेमसंबंधाविषयी कथा वाचली तेव्हा ती मला खूप आवडली. माझी कंपनी ‘रेड चिलीज्’ त्यावर चित्रपट बनवणार होती. आता संजयने तो प्रोजेक्ट हाती घेतला आहे. त्याने मला स्क्रीप्ट पुन्हा दाखवली असून आम्ही बरीच चर्चा केली. पण अद्याप काही निश्चित नाही. पुढच्या आठवड्यात २७ किंवा २८ तारखेला आम्ही पुन्हा भेटणार आहोत.’
‘देवदास’नंतर शाहरुख-संजय पुन्हा एकत्र येणार असल्यामुळे या चित्रपटाविषयी खूप उत्सुकता आहे. कवयित्री आणि लेखिका अमृता प्रितमशी साहिर यांचे असणारी प्रेमकहाणी आणि त्यानंतर त्यांच्या जीवनात प्रवेश केलेल्या सुधा मल्होत्रा यांच्याविषयी या बायोपिकची कथा गुंफण्यात आली आहे.
सुरूवातील प्रमुख भुमिकेसाठी इरफान खान आणि फवाद खान यांच्या नावांचा विचार झाला होता. पण आता असे स्पष्ट दिसतेय की, हा आयकॉनिक रोल किंग खान एसआरकेच्या पारड्यात पडणार. यामध्ये त्याची हीरोईन कोण असणार हा देखील हॉट मुद्दा आहे. मध्यंतरी प्रियांकाचे नाव समोर आले होते. मात्र तिने स्वत: या वृत्ताचे खंडन केले.ALSO READ: गौरीला दिलेल वचन शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा विसरणार का ?