Join us
Daily Top 2Weekly Top 5

​शाहरूख खान म्हणतो, माझी मुले मीडियासोबत माझ्यासारखीच वागतील याचा नेम नाही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2017 10:56 IST

बॉलिवूडचा सुपरस्टार, किंगखान शाहरूख खान याच्या ‘मन्नत’वर काल ईद मोठ्या उत्साहात साजरी झाली. यावेळी मन्नतबाहेर जमलेल्या चाहत्यांना शाहरूखने अभिवादन ...

बॉलिवूडचा सुपरस्टार, किंगखान शाहरूख खान याच्या ‘मन्नत’वर काल ईद मोठ्या उत्साहात साजरी झाली. यावेळी मन्नतबाहेर जमलेल्या चाहत्यांना शाहरूखने अभिवादन केले. यावेळी त्याच्यासोबत चिमुकला अबरामही होता. यानंतर ईद सेलिब्रेशनसाठी शाहरूखने खास मीडियाला निमंत्रित केले होते. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्याने स्वत:बद्दल व आपल्या मुलांबद्दल अनेक रोचक गोष्टी सांगितले.अलीकडे एका रेस्टारंटच्या उद्घाटनाला शाहरूख व त्याची मुलगी सुहाना एकत्र दिसले होते. यानंतर या बाप-लेकीचे फोटो सोशल मीडियावर ट्रेंड करायला लागले होते. शाहरूख याबद्दलही बोलला. माझी मुले खूप अधिक मीडिया अटेंशनमुळे अवघडल्यासारखे होतात. त्यामुळे  सार्वजनिकस्थळी ते मीडियाशी माझ्यासारखेच वागतील, मी जसा मीडियाला हँडल करतो, तसेच करतील, याचा भरवसा नाही. मी मीडियाला नम्र विनंती करतो की, मीडियाला पाहून ते टेन्शनमध्ये येतात. ते सार्वजनिक स्थळी दिसण्याचा अर्थ प्रत्येकवेळी त्यांच्या बॉलिवूड डेब्यूशी संबधित असा काढता येणार नाही, असे शाहरूख म्हणाला. सुहानाला अभिनेत्री बनायचे आहे. पण शिक्षण पूर्ण करण्याबाबत मी आग्रही आहे, असेही त्याने सांगितले.धर्म हा खासगी मुद्दा आहे. माझ्या मुलांवर मी याबाबतीत कुठलाही दबाब टाकणार नाही. धर्म त्यांनी स्वत: समजून घ्यावा, असे मला वाटते. माझ्या आईवडिलांनी मला सर्व धर्माचा आदर करायला शिकवले आहे. माझी ही माझ्या मुलांना हीच शिकवण असेल. मी स्वत: गेल्या दीड वर्षांपासून महाभारत वाचतो आहे. यातील कथा मला खुणावतात. मी अबरामला महाभारतातील अनेक कथा ऐकवतो. त्याचप्रमाणे इस्लाम धर्मातील कथाही सांगतो, असे शाहरूखने सांगितले.