शाहरूख खानने नाही दिले वाढदिवसाचे रिटर्न गिफ्ट; चाहत्यांची अशी झाली निराशा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 12:59 IST
शाहरूख खानने चाहत्यांचे आशीर्वाद, प्रेम, शुभेच्छा सगळे काही स्वीकारले. पण हे करताना चाहत्यांना रिटर्न गिफ्ट द्यायला मात्र तो विसरला.
शाहरूख खानने नाही दिले वाढदिवसाचे रिटर्न गिफ्ट; चाहत्यांची अशी झाली निराशा!!
शाहरूख खानने काल गुरुवारी (२ नोव्हेंबर) आपला वाढदिवस साजरा केला. अलिबागच्या फार्महाऊसवर शाहरूखच्या वाढदिवसाचे ग्रॅण्ड सेलिब्रेशन झाले. याशिवाय शाहरूखने चाहत्यांसोबत केकही कापला, मीडियासोबतही तो बोलला. इतकेच नाही तर‘मन्नत’ बाहेर उभ्या असलेल्या शेकडो चाहत्यांना दर्शन देत त्याने त्यांचेआशीर्वाद, प्रेम, शुभेच्छा सगळे काही स्वीकारले. पण हे करताना चाहत्यांना रिटर्न गिफ्ट द्यायला मात्र शाहरूख विसरला.