फरहान अख्तरच्या 'डॉन ३' वर सध्या वेगवेगळे अपडेट समोर येत आहेत. गेल्या वर्षी त्याने रणवीर सिंह यावेळी 'डॉन ३'मध्ये असणार अशी घोषणा केली होती. शाहरुख खानने सिनेमासाठी नकार दिल्याची चर्चा झाली. मात्र नुकतंच रणवीरने 'धुरंधर' हा ब्लॉकबस्टर सिनेमा दिला आणि नंतर अचानक त्यानेही 'डॉन ३' सोडला. फरहान किंवा रणवीर दोघांनीही अद्याप यावर बोलणं टाळलं आहे. त्यातच आता शाहरुखच 'डॉन' साकारणार अशी चर्चा रंगली आहे. मात्र यासाठी शाहरुखने फरहानसमोर एक अट ठेवली आहे.
'मै हूँ डॉन'
शाहरुख खानला एकेकाळी 'डॉन' अणि 'डॉन २' मुळे कमालाची प्रसिद्धी मिळाली होती. या सिनेमांनी त्याच्या करिअरला वेगळी दिशा दिली होती. रोमँटिक हिरोच नाही तर तो सुपरहिट व्हिलनही बनला होता. मात्र आता 'डॉन ३'मध्ये नवा डॉन असावा अशी त्याची इच्छा होती आणि त्याने फरहानला ती बोलूनही दाखवली होती. फरहानने रणवीर सिंहची निवड केली. पण रणवीरने सिनेमा सोडल्यानंतर फरहान पुन्हा शाहरुखकडेच गेल्याची चर्चा आहे. यावर शाहरुखने एका अटीवर सिनेमा करण्यास होकार दिला आहे. टेलीचक्कर रिपोर्टनुसार, शाहरुख खान 'डॉन ३' मध्ये काम करण्यासाठी तयार झाला आहे. तो आपल्या आयकॉनिक भूमिकेत परत येतोय. मात्र त्याने फरहानसमोर एक अट ठेवली आहे. शाहरुखचा मेजर कमबॅक असलेला सिनेमा 'जवान'चा दिग्दर्शक ॲटलीलाही 'डॉन ३'प्रक्रियेत सहभागी करुन घेण्याची अट शाहरुखने ठेवली आहे. सिनेमाची स्केल वाढवण्यासाठी शाहरुखने ॲटलीचं नाव सुचवलं आहे. अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही. मेकर्स आणि कलाकारांकडून याबाबत अधिकृत माहिती आलेली नाही.
शाहरुख खानला पुन्हा 'डॉन'च्या भूमिकेत पाहण्यासाठी त्याचे चाहते तर उत्सुक आहेतच. पण आता फरहान अख्तर त्याची ही अट मान्य करतो का हे पाहणं महत्वाचं आहे. २०२३ पूर्वी शाहरुखचे अनेक सिनेमे सलग फ्लॉप झाले होते. २०२३ साली ॲटलीच्या 'जवान'सिनेमामुळे त्याचं दमदार कमबॅक झालं होतं. शाहरुखचा ॲटलीवर प्रचंड विश्वास असल्याचंच यातून दिसून येतं.
Web Summary : Shah Rukh Khan might reprise his role as Don in 'Don 3' after Ranveer Singh's exit, but he has set a condition. He wants 'Jawan' director Atlee involved to elevate the film's scale. Official confirmation is awaited.
Web Summary : रणवीर सिंह के बाहर निकलने के बाद शाहरुख खान 'डॉन 3' में डॉन के रूप में अपनी भूमिका फिर से निभा सकते हैं, लेकिन उन्होंने एक शर्त रखी है। वह चाहते हैं कि फिल्म का स्तर बढ़ाने के लिए 'जवान' के निर्देशक एटली को शामिल किया जाए। आधिकारिक पुष्टि का इंतजार है।