Join us
Daily Top 2Weekly Top 5

​शाहरूख खानने केली सेल्फीसाठी विनंती! खळखळून हसली हॉलिवूड अभिनेत्री केट ब्लँचेट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 11:28 IST

किंगखान शाहरूख खान जिथे जाईत तिथे ‘माहौल’ करतो. स्वित्झर्लंडच्या दावोस येथे आयोजित २४ व्या क्रिस्टल अवार्ड्स सोहळ्यातही त्याने हेच केले. या सोहळ्यात शाहरूखला क्रिस्टल अवार्ड्सने सन्मानित करण्यात आले.

किंगखान शाहरूख खान जिथे जाईत तिथे ‘माहौल’ करतो. स्वित्झर्लंडच्या दावोस येथे आयोजित २४ व्या क्रिस्टल अवार्ड्स सोहळ्यातही त्याने हेच केले. या सोहळ्यात शाहरूखला क्रिस्टल अवार्ड्सने सन्मानित करण्यात आले.  या खासप्रसंगी शाहरूखने दिलेले भाषण सर्वाधिक प्रभावी ठरले. मी या पुरस्कारासाठी मनापासून धन्यवाद देतो, अशा शब्दांत त्याने आयोजक व उपस्थितांचे आभार मानले आणि सरतेशेवटी ‘नमस्कार’ आणि ‘जय हिंद’ म्हणत,त्याने आपल्या भाषणाचा शेवट केला. विशेष म्हणजे, भाषण संपण्यापूर्वी शाहरूखने हॉलिवूड अभिनेत्री केट ब्लँचेट हिला खुलेआम सेल्फीसाठी विनंती केली. मी असा सेल्फीसाठी आग्रह करताना पाहून माझ्या मुलांना लाजीरवाणे वाटू शकते, असेही तो म्हणाला. त्याचे ते वाक्य ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. अभिनेत्री केटही यावर खळखळून हसली.भारतात सामाजिक कार्यातील योगदानासाठी शाहरूखला हा पुरस्कार देण्यात आला.  मुलांच्या रूग्णालयात विशेष वार्ड बनविणे आणि कॅन्सरशी लढणाºया मुलांना मोफत निवास व्यवस्था पुरविण्याचे कार्य शाहरूख करतो आहे. याशिवाय ‘मीर फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेचा तो संस्थापक आहे. ही संघटना अ‍ॅसिड हल्ल्यातील महिलांना कायदेशीर मदत करते. शिवाय त्यांना रोजगार व पुनर्वसनात मदत करते.शाहरूखने दावोसमधील बर्फाच्छादित रस्त्यावरचा स्वत:चा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला. याठिकाणी शाहरूख त्याची खास सिग्नेजर पोज देताना दिसला. स्वित्झर्लंडमध्ये येऊन हे नाही केले तर मग काय केले? दावोसला येऊन खूप आनंदी आहे. पण भाईसाहब, प्रचंड थंडी आहे. प्रेम आणि मैत्रीची ऊब मिळेल, अशी आशा करतो, असे त्याने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे.शाहरूख सध्या आनंद एल राय यांच्या ‘झिरो’ या चित्रपटात  बिझी आहे. या चित्रपटात शाहरूख एका बुटक्या व्यक्तिची भूमिका साकारताना दिसणार आहे.