Join us  

जबरदस्त अ‍ॅक्शन अन् कमाल डायलॉग! शाहरुखच्या 'जवान' चा धमाकेदार प्रीव्ह्यू रिलीज, उत्सुकता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 11:16 AM

'जवान'च्या प्रीव्यूची सुरुवातच शाहरुखच्या खानच्या आवाजात होते.

किंग खानच्या बहुप्रतिक्षित 'जवान' सिनेमाचा प्रीव्ह्यू नुकताच रिलीज झाला आहे. चाहते अनेक दिवसांपासून जवानची झलक पाहण्यासाठी आतुर होते. आता हा प्रीव्ह्यू पाहून सिनेमाची उत्सुकता आणखी ताणली आहे. शाहरुखच्या आवाजामुळे आणि अ‍ॅक्शन सीन्समुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. शाहरुखसोबतच अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि साऊथ अभिनेत्री नयनतारा देखील भाव खाऊन जातात. तसंच व्हिडिओतील डायलॉग लक्ष वेधून घेणारे आहेत.

'जवान'च्या प्रीव्यूची सुरुवातच शाहरुखच्या खानच्या आवाजात होते. मी कोण आहे कोण नाही माहित नाही, आईला दिलेलं वचन की एक अपूर्ण हेतू, मी चांगला आहे की वाईट, पुण्य की पाप हे स्वत:लाच विचारा कारण 'मै भी आप हूँ'. शाहरुख खानच्या या डायलॉगबाजीने आणि भरपूर अ‍ॅक्शन सीन्सने प्रीव्यूची सुरुवात होते. दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि दीपिका पदुकोणचीही यात झलक दिसते. नयनतारा महिला पोलिस अधिकारीच्या भूमिकेत आहे. तर दीपिका पदुकोणचा सिनेमात स्पेशल अपिअरन्स आहे. लाल साडीत अॅक्शन करताना दिसत आहे. शाहरुखचा हा खलनायकी अवतार पाहून चाहते प्रभावित झाले आहेत.

7 सप्टेंबर रोजी रिलीज होणार 'जवान'

दाक्षिणात्य दिग्दर्शक अ‍ॅटलीने 'जवान'च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. फिल्ममध्ये शाहरुख खानचा डबल रोल आहे. शाहरुखशिवाय नयनतारा, प्रियामणि, सुनील ग्रोवर आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत आहेत. सुमारे 220 कोटी रुपये खर्च करुन सिनेमा बनवण्यात आलाय. 'जवान' हिंदी सिनेमा असून इतर भाषांमध्ये डब केला जाणार आहे. तसंच सान्या मल्होत्रा आणि रिद्धी डोगरा यांचीही भूमिका आहे. तर संजय दत्तचा कॅमिओ असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :शाहरुख खाननयनतारादीपिका पादुकोणबॉलिवूड