Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनेरी साडीत गौरी तर सुहानाने परिधान केला लेहेंगा, अर्जुनच्या लग्नात किंग खानच्या कुटुंबाने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 17:52 IST

अर्जुन तेंडुलकरच्या लग्नात अवतरले बॉलिवूड कलाकार, आमिर खान एकटाच आला

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर आज, ५ मार्च २०२६ रोजी सानिया चांडोकसोबत विवाहबंधनात अडकला. मुंबईत पार पडलेला हा विवाहसोहळा या वर्षातील सर्वात चर्चेतील आणि भव्य सोहळ्यांपैकी एक ठरला आहे. या शाही विवाह  सोहळ्यात क्रिकेट, बॉलिवूड आणि उद्योग जगतातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावून नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले.

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे अभिनेता शाहरुख खान. शाहरुख आपली पत्नी गौरी खान आणि मुलगी सुहाना खान यांच्यासह पारंपारिक वेशभूषेत या लग्नाला पोहोचला. गौरी खानने सोनेरी रंगाची साडी परिधान केली होती, तर सुहानाने हलक्या सोनेरी रंगाच्या लेहेंग्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शाहरुखने आपल्या खास शैलीत सर्वांना 'सलाम' करत उपस्थितांची मने जिंकली. 

शाहरुखशिवाय अभिनेता आमिर खाननेही या सोहळ्याला हजेरी लावली. चमकदार शेरवानी परिधान केलेल्या आमिरने एकट्यानेच प्रवेश करत पापाराझींना भरभरून पोज दिल्या. त्याच्यासोबत गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट न आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.

या विवाहसोहळ्याला बच्चन कुटुंबियांचीही उपस्थिती होती. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासह फरहान अख्तर आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनीही हजेरी लावली होती. क्रिकेट विश्वातून एमएस धोनी, सुरेश रैना, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, इरफान पठाण आणि हरभजन सिंग यांसारखे स्टार खेळाडू आपल्या कुटुंबासह पोहोचले होते. तसेच आयसीसीचे जय शाह आणि अनेक बड्या उद्योगपतींनीही या सोहळ्याची शोभा वाढवली.

कोण आहे सानिया चांडोक? सानिया चंडोक ही 'ग्रेविस ग्रुप'चे प्रमुख रवी घई यांची नात आहे. हा समूह हॉटेल आणि खाद्यपदार्थ क्षेत्रात विस्तारलेला आहे. रवी घई यांचा मरीन ड्राईव्ह येथील 'इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल'शी संबंध आहे, तसेच ते 'द ब्रुकलिन क्रीमरी' या ब्रँडचे मालक आहेत. सानियाचा स्वत: मुंबईतील वरळी येथेपेट स्पा चालवते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Khan Family Steals Spotlight at Arjun Tendulkar's Star-Studded Wedding

Web Summary : Arjun Tendulkar married Sania Chandok in a grand Mumbai ceremony. Shah Rukh Khan and family attended in traditional attire. Aamir Khan, the Bachchans, cricketers, and industrialists also graced the event. Sania is linked to the Gravis Group and owns a pet spa.
टॅग्स :शाहरुख खानआमिर खानबॉलिवूडअर्जुन तेंडुलकर