बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खान केवळ त्याच्या अभिनयासाठीच नाही, तर त्याच्या संवेदनशील स्वभावासाठीही ओळखला जातो. शाहरुख हा एक मोठा प्राणीप्रेमी आहे. त्याच्याकडे 'डॅश', 'हल्क', 'काय' आणि 'ज्युसी' यांसारखे अनेक पाळीव कुत्रे होते आणि तो त्यांच्याशी खूप भावनिकरित्या जोडलेला होता. शाहरुखच्या या प्राणीप्रेमाची साक्ष देणारा एक अत्यंत भावुक आणि धक्कादायक किस्सा अनेक वर्षांनंतर समोर आला आहे.
सोशल मीडियावर सध्या एक जुना व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शाहरुखची पत्नी गौरी खानच्या काकांनी (Gauri Khan's Uncle) शाहरुख खानबाबत एक खुलासा केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये गौरीचे काका सांगतात की, "गौरी माझी भाची आहे. मी तिला एक 'चायनीज पेकिंगीज' जातीचा कुत्रा भेट दिला होता. शाहरुखलाही तो कुत्रा प्रचंड आवडायचा. एकदा शाहरुख शूटिंगसाठी मुंबईबाहेर गेला असताना अचानक त्या कुत्र्याचा मृत्यू झाला. शाहरुख घरी नसल्यामुळे घरातील मुलांनी त्या कुत्र्याला एका चांगल्या कापडात गुंडाळले, समुद्रकिनाऱ्यावर नेले आणि तिथे खड्डा करून त्याला दफन केले".
ते पुढे म्हणाले, "मध्यरात्रीनंतर जेव्हा शाहरुख खान शूटिंगवरून घरी परतला, तेव्हा त्याने सर्वात आधी आपल्या लाडक्या कुत्र्याबद्दल विचारले. जेव्हा त्याला समजले की कुत्र्याचा मृत्यू झाला असून त्याला समुद्रकिनाऱ्यावर पुरले आहे, तेव्हा शाहरुख स्तब्ध झाला. त्याने रात्री २:३० वाजता घरातल्या मुलांना उठवले आणि म्हणाला, 'मला आत्ताच्या आत्ता ती जागा दाखवा'. शाहरुख मुलांना घेऊन समुद्रकिनाऱ्यावर गेला, तिथे त्याने स्वतः कबर खोदली आणि कुत्र्याचा मृतदेह बाहेर काढला".
कुत्र्याचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर शाहरुख अत्यंत भावुक झाला होता आणि त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो घरातल्यांवर रागावला आणि म्हणाला, "माझ्या कुत्र्याला असे लांब फेकून देण्याची तुमची हिम्मत कशी झाली? तो जिवंत असो वा मृत, त्याला आपल्यासोबतच राहायचे आहे". शाहरुखने त्या पाळीव कुत्र्याला परत मन्नत (Mannat) बंगल्यात आणले आणि आपल्या घरामागील अंगणात सन्मानाने दफन करून ती जागा चिन्हांकित केली.
शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो आगामी 'किंग' (King) या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत त्याची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
Web Summary : Gauri Khan's uncle revealed Shah Rukh Khan's deep love for his pet dog. After the dog's death, SRK, upon returning from a shoot, exhumed the dog's body at 2:30 AM and reburied it respectfully at his home, Mannat.
Web Summary : गौरी खान के चाचा ने शाहरुख खान के अपने पालतू कुत्ते के प्रति गहरे प्रेम का खुलासा किया। कुत्ते की मृत्यु के बाद, शूटिंग से लौटने पर, एसआरके ने रात 2:30 बजे कुत्ते के शरीर को कब्र से निकाला और उसे सम्मानपूर्वक अपने घर, मन्नत में फिर से दफनाया।