Join us

शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर

By देवेंद्र जाधव | Updated: July 26, 2025 12:10 IST

शाहरुखच्या कामात एक प्रकारची शिस्त आहे. यामागे त्याच्या दैनंदिन आयुष्यातील योग्य वेळापत्रक कारणीभूत आहे. जाणून घ्या त्याचविषयी

बॉलिवूडचा 'बादशहा' म्हणजे शाहरुख खान! शाहरुखच्या आजवरच्या यशामागे त्याची रोजच्या जीवनातील शिस्त कारणीभूत आहे. शाहरुख त्याच्या दिवसातले २४ तास कसे वापरतो हे सर्वांना पाहण्यासारखं आहे. याशिवाय शाहरुख फिटनेस, जेवण आणि स्वतःसाठीचा वेळ कसा राखून ठेवतो हे पाहणंही कुतुहलाचा विषय आहे. जाणून घ्या शाहरुखच्या याच जीवनशैलीबद्दल सविस्तर

  • झोपेचं गणित

शाहरुख दिवसातून फक्त तीन-चार तास झोपतो. 'जास्त झोप म्हणजे आयुष्य वाया घालवणं' असं शाहरुख मानतो. तो पहाटे ५ वाजता झोपायला जातो आणि सकाळी ९–१० ला उठतो. इतकी कमी झोप असूनही दिवसभर ऊर्जा, उत्साह कायम ठेवणं हीच त्याची खासियत! तो सांगतो, “माझं कामावर आणि चाहत्यांचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की, कमी झोप घेऊनही माझ्यात एनर्जी टिकून असते.”

  • आहार 

शाहरुख दिवसातून दोन वेळाच खातो. दुपारी आणि रात्री व्यवस्थित जेवणं हेच त्याच्या फिटनेसचं रहस्य आहे. फिटनेसवर प्रेम असल्यामुळे त्याच्या जेवणात स्प्राऊट्स, ग्रिल्ड चिकन, ब्रोकोली, सूप, कोशिंबीर, डाळ या पदार्थांचा समावेश असतो. तांदूळ, ब्रेड, साखर, बेकरीचे पदार्थ आणि दारूला तो पूर्णपणे टाळतो. 

  • व्यायाम

शाहरुखचं वर्कआउट वेळापत्रक वेगळंच आहे. तो रात्री उशिरा व्यायाम करतो. १०० पुशअप्स, ६० पुलअप्स, स्ट्रेंथ ट्रेनिंग, कार्डिओ हे सगळं मिळून तास-दीड तासाचा कडक व्यायाम शाहरुख करतो! त्यानंतर प्रोटीन शेक पितो. 

  • कामाचा वेगळा अंदाज

रात्री काम करायला शाहरुखला सगळ्यात जास्त आवडतं. शांत, निःशब्द वातावरणात कल्पनाशक्तीला अधिक वाव मिळतो, असं त्याचं म्हणणं आहे मग यात स्क्रिप्ट्स वाचणं, रेड चिलीजचे प्रोजेक्ट, तयार होणाऱ्या सिनेमाची चर्चा हे त्याचं रात्रीचं 'वर्क मोड'. त्याचं म्हणणं- "रात्रीचा वेळ म्हणजे माझ्यासाठी खऱ्या अर्थानं क्रिएटिव्ह गोष्टी करण्यासारखा आहे."

  • बाथरूमचा वेगळाच शौक!

शाहरुखचं बाथरूम म्हणजे फक्त आंघोळीची जागा नाही, ती त्याची खास रिलॅक्स झोन आहे! मन्नतच्या बाथरूममध्ये शाहरुख २-३ तास आरामात काढतो. टीव्ही, फोन, म्युझिक सेटअप अशा अनेक गोष्टी शाहरुखच्या बाथरुममध्ये आहेत. इथे तो स्वतःला नवी ऊर्जा देतो, अनेक गोष्टींवर विचार करतो.

  • कुटुंबप्रेम

कितीही मोठा स्टार असो, शाहरुख कुटुंबाचं महत्त्व विसरत नाही. मुलं आर्यन, सुहाना आणि अबराम यांच्यासोबत शाहरुख क्वालिटी टाईम घालवतो. पत्नी गौरीसोबत अनेक गोष्टींवर चर्चा करतो; घरच्या लोकांना वेळ देणं, त्यांच्यासोबत गप्पा, सिनेमा पाहणं, हा सगळा आनंद तो मनापासून घेतो.

शाहरुखच्या यशाचा फंडा

शाहरुख म्हणतो, "यशासाठी कोणताही शॉर्टकट नाही. फक्त मेहनत, जबरदस्त पॉझिटिव्ह दृष्टीकोन आणि न संपणारी इच्छाशक्ती हवी." शाहरुख कधीच थकत नाही, नवीन संधी शोधतो, स्वतःला अपडेट ठेवतो, आणि एक ‘सुपरस्टार’ असूनही मित्रांकडून नव्या गोष्टी शिकतो, घरी रमतो. अशाप्रकारे शाहरुख खानचं २४ तासांचं दैनंदिन आयुष्य सर्वांनी फॉलो केलं तर तुम्हीही 'बादशाह'सारखंच यशस्वी जीवन जगाल, ही शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :शाहरुख खानफिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्यआहार योजना