बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान गेल्या काही वर्षांत एकही हिट देऊ शकला नाही. खरे तर या वर्षांत शाहरूखने आपल्या भूमिकेबद्दल नवनवे प्रयोग केले. मग तो ‘फॅन’ असो वा ‘झिरो’तील बुटक्या व्यक्तीची व्यक्तिरेखा. पण याऊपरही चाहत्यांनी शाहरूखच्या या चित्रपटांकडे पाठ फिरवली. समीक्षकांनीही शाहरुखच्या या चित्रपटांवर जोरदार टीका केली. समीक्षकांच्या या टीकेला उत्तर देण्यासाठी शाहरूख ब-याच दिवसांपासून एका संधीच्या शोधात होता. अखेर ‘क्रिटिक्स फिल्म अवॉर्ड २०१९’च्या निमित्ताने एसआरकेने ही संधी गाठलीच. पोडियमवर येताच शाहरूख त्याचे अलीकडचे चित्रपट आणि समीक्षकांची टीका यावर बोलला.
शाहरूख खान समीक्षकांवर घसरला, म्हणे, चित्रपट आहे; हॉटेल नाही!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 14:21 IST
समीक्षकांच्या या टीकेला उत्तर देण्यासाठी शाहरूख ब-याच दिवसांपासून एका संधीच्या शोधात होता. अखेर ‘क्रिटिक्स फिल्म अवॉर्ड २०१९’च्या निमित्ताने एसआरकेने ही संधी गाठलीच.
शाहरूख खान समीक्षकांवर घसरला, म्हणे, चित्रपट आहे; हॉटेल नाही!!
ठळक मुद्देशाहरुखचा अलीकडे आलेला ‘झिरो’ फ्लॉप झाला. या चित्रपटानंतर शाहरूखचे नाव अनेक चित्रपटांशी जोडले गेले. पण अद्याप त्याने कुठल्याही चित्रपटाचे काम सुरु केलेले नाही.