Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेजर राम पुन्हा परतणार? २२ वर्षानंतर शाहरुखच्या 'मै हूँ ना'चा सीक्वल येणार? मोठी अपटेड समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 18:28 IST

शाहरुख अन् फराह खाननं केली हातमिळवणी!  २२ वर्षांनंतर 'या' गाजलेल्या सिनेमाच्या सीक्वल येणार 

Main Hoon Na Movie Sequel Update: बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेल्या शाहरुख खानचा जगभरात चाहतावर्ग आहे.अभिनेता शाहरुख खानच्या सगळ्याच चित्रपटांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आहे. तसंच आगामी काळातही तो नव्या चित्रपटांमधून आपल्या भेटीला येणार आहे. अशातच  शाहरुखच्या एका गाजलेल्या चित्रपटाच्या सीक्वलबद्दल सिनेविश्वात चर्चा रंगली आहे.  कोणता आहे तो सिनेमा? जाणून घेऊया...

दरम्यान,  २०१४ मध्ये आलेल्या 'हॅपी न्यू इयर' चित्रपटानंतर शाहरुख खान आणि फराह खान यांनी एकत्र काम केलेलं नाही. मीडिया रिपोर्टनुसार, लवकरच फराह आणि शाहरुख एका मोठ्या प्रोजेक्टनिमित्ताने १२ वर्षांनी एकत्र येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 'मैं हूं ना २' ची तयारी सुरू आहे.  फराह खान सध्या 'मैं हूं ना, सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम करते आहे. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, फराह खानच्या  या चित्रपटात शाहरुख दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.शाहरुख खानलाही ही कल्पना आवडली आणि तो या चित्रपटाबद्दल उत्सुक आहे. 

२००४ साली प्रदर्शित झालेला 'मैं हूं ना' (Main Hoon Na) हा चित्रपट शाहरुख खानच्या करिअरमधील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो. दिग्दर्शक फराह खानच्या या चित्रपटाची कथा आणि गाण्यांनी चाहत्यांची मने चांगलीच जिंकली. आज २२ वर्षांनंतरही मैं हूं ना या चित्रपटाचे रसिकांच्या मनातील स्थान कायम आहे. या चित्रपटात शाहरुख खान, सुष्मिता सेन, सुनील शेट्टी, जायद खान आणि अमृता राव या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. तर शाहरुखने  सिनेमात साकारलेला मेजर राम आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Is 'Main Hoon Na' Sequel Coming? Shah Rukh to Return?

Web Summary : A 'Main Hoon Na' sequel is reportedly in the works. Farah Khan is writing the script, potentially featuring Shah Rukh Khan in a dual role, generating excitement after 20 years.
टॅग्स :शाहरुख खानफराह खानबॉलिवूडसिनेमा