Join us
Daily Top 2Weekly Top 5

बुर्ज खलिफावर पुन्हा झळकला शाहरुख, व्हिडिओतून सांगतिली प्रेरणादायी कथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 11:51 IST

शाहरुखने व्हिडिओच्या माध्यमातून ही स्टोरी सांगितली. 

बॉलिूवड बादशहा शाहरुख खानचे जगभरात चाहते आहेत. शाहरुखच्या डीडीएलजे चित्रपटावर चक्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही भाष्य केलं होतं. त्यामुळेच, शाहरुख हा इंटरनॅशनल ब्रँड आहे. म्हणूनच, जगातील सर्वांत उंच बिल्डिंग आलेल्या दुबईतील बुर्ज खलिफावरुन शाहरुख खानला त्याच्या 55 व्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. आता, पुन्हा एकदा शाहरुख बुर्ज खलिफावर चमकला आहे. युएईमधील एका आरोग्य क्षेत्रातील उद्योगाची प्रेरणादायी कथा सांगण्यासाठी शाहरुख जगातील सर्वात उंच इमारतीवरुन पुन्हा एकदा झळकला. शाहरुखने व्हिडिओच्या माध्यमातून ही स्टोरी सांगितली. यावेळी, चाहत्यांनी व्हिडिओ काढण्यासाठी बुर्ज खलिफासमोर मोठी गर्दी केली होती. 

एका NRI व्यावसायिकाच्या मालकीच्या UAE-आधारित समूहाची प्रेरणादायी कथा शाहरुखने बुर्ज खलिफावरुन सांगितली. UAE मधील सर्वात मोठ्या आरोग्य सेवा पुरवठादारांपैकी एक असलेल्या Burjeel Holdings द्वारे एकात्मिक ब्रँड मोहिमेचा शुभारंभ या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाला. UAE आणि ओमानमध्ये बुर्जील, मेडिओर, LLH, लाइफकेअर आणि ताजमील ब्रँड अंतर्गत 39 रुग्णालये आणि वैद्यकीय केंद्रांचा मालक आहे. या बिझनेस ग्रुपचा शाहरुख खान ब्रँड अम्बेसिडर आहे. या सोहळ्यामुळे युएईशी शाहरुखचं असलेलं नातं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. 

बुर्ज खलिफावर यापूर्वीही झळकला होता शाहरुख

बुर्ज खलिफावर शाहरुख खानला त्याच्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, डॉन आणि रा-वन मधील भूमिकांचे फोटो दाखवत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या काचेच्या इमारतीवर विद्युत रोषणाईच्या माध्यमातून प्रोजेक्शन करून शुभेच्छा दिल्या जातात. त्यानंतर त्याने त्याच्या या शुभेच्छांबद्दल आपल्या ट्विटर आणि इन्टाग्राम अकाऊंटवर आभार मनात एक सुंदर मेसेज लिहिला होता. त्यामध्ये त्याने आपली मुलं सुहाना, आर्यन आणि अब्राम इम्प्रेस झाल्याचंदेखील सांगितलं होतं. 

टॅग्स :शाहरुख खानदुबईव्यवसाय