Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुख खानचा सल्ला काजोलला वाटायचा बकवास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 15:27 IST

शाहरुख खान आणि काजोल ही नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध जोड्यांपैकी एक आहे. शाहरुख आणि काजोलच्या जोडीने अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केले आणि त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांनाही चांगलीच भावली.

ठळक मुद्देशाहरुख काजोलला सतत सल्ले द्यायचा शाहरुखने तिला अभिनय शिकण्याचा सल्ला देखील दिला होता

शाहरुख खान आणि काजोल ही नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध जोड्यांपैकी एक आहे. शाहरुख आणि काजोलच्या जोडीने अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केले आणि त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांनाही चांगलीच भावली. काजोल सध्या तिचा आगामी सिनेमा हेलिकॉप्टर ईलाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. एका इंटरव्हु दरम्यान काजोल म्हणाली की, शाहरुख मला सतत ज्ञान द्यायचा. बाजीगर सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचा एक किस्सा काजोलने सांगितला, जेव्हा संधी मिळायची शाहरुख तिला काहीना काही तरी सल्ला द्यायला यायचा. ऐवढेच नाही तर शाहरुखने तिला अभिनय शिकण्याचा सल्ला देखील दिला होता. शाहरुखने सांगितले तुला अजून मेहनत करायची गरज आहे. त्यावेळी मला वाटले होते कधी-कधी शाहरुख वायफळ बडबड करतो.     

लवकरच काजोलचा 'हेलीकॉप्टर ईला' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात काजोल एका सिंगल मदरची भूमिका साकारणार आहे जिची गायिका होण्याची इच्छा असते. आई- मुलाच्या नात्यावर हा सिनेमा आधारित आहे. 'हेलीकॉप्टर ईला' ही एक मॉर्डन आई आणि तिच्या एकुलत्या एक मुलाची हटके कहाणी आहे, जी आपल्या प्रत्येकाच्य आयुष्याच्या फार जवळची वाटते. जबाबदार आईबरोबरच एका महत्वाकांक्षी गायिकेच्या रुपात काजोलला या सिनेमात पाहता येणार आहे. या गंभीर आणि नाजूक विषयाला अत्यंत मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडला आहे. यात काजोल, रिद्धिसोबत नेहा धूपियाचीही महत्त्वाची भूमिका आहे. 'हेलिकॉप्टर ईला' हा सिनेमा एका गुजराती नाटकावर आधरित आहे. मितेश शाह द्वारा लिखित अजय देवगण आणि पेन इंडियाद्वारा या सिनेमाची निर्मीती करता येणार आहे. 

टॅग्स :काजोलशाहरुख खान