Join us

​शाहरूख-अबरामचे किस आॅफ लव्ह..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2016 18:14 IST

आज ईदच्या दिवशी शाहरूख खानने आपल्या चाहत्यांना आगळेवेगळे गिफ्ट दिले. आज सकाळपासून शेकडो चाहते किंगखानची एक झलक पाहण्यासाठी मन्नत ...

आज ईदच्या दिवशी शाहरूख खानने आपल्या चाहत्यांना आगळेवेगळे गिफ्ट दिले. आज सकाळपासून शेकडो चाहते किंगखानची एक झलक पाहण्यासाठी मन्नत बाहेर ताटकळत उभे होते आणि अगदी काही वेळापूर्वी किंगखान आला आणि त्याने जिंकलेच..होय, कारण किंगखान एकटा आला नाही तर त्याच्यासोबत त्याचा क्यूट अबरामही होता. शाहरूख आणि अबरामने चाहत्यांना किस आॅफ लव्ह दिला आणि मन्नत समोरच्या गर्दीने एकच जल्लोष केला. होय, शाहरूख व अबराम दोघेही पांढºया शुभ्र पोशाखात मन्नतच्या गॅलरीत आला. आल्याबरोबर शाहरूखने चाहत्यांना सॅल्यूट केले. पाठोपाठ अबरामही सॅल्यूट करताना दिसला आणि मग शाहरूखने अबरामला एक गोड पापा दिला..या ‘जश्न’चे फोटो पाहाल तर तुम्हीही म्हणाल...सो क्यूट ना!