शाहीदचा ‘उडता पंजाब’मधील ‘रॉकस्टार’ लुक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 10:39 IST
मागील वर्षीपासून ‘उडता पंजाब’ चित्रपट चर्चेत आहे. चित्रपट जूनमध्ये रिलीज होणार असून त्याची शूटिंग आता संपली आहे.
शाहीदचा ‘उडता पंजाब’मधील ‘रॉकस्टार’ लुक!
मागील वर्षीपासून ‘उडता पंजाब’ चित्रपट चर्चेत आहे. चित्रपट जूनमध्ये रिलीज होणार असून त्याची शूटिंग आता संपली आहे. प्रमोशनला सुरूवात करण्याअगोदर चित्रपटाच्या टीमने चित्रपटाचा लोगो आणि टीजर पोस्टर आऊट करण्यात आले आहे.शाहीद कपूरचा ‘उडता पंजाब’मधील टॉमी सिंग म्हणून फर्स्ट लुक ‘रॉकस्टार’ च्या रूपात आऊट करण्यात आला आहे. त्याने अतिशय कसदार शरीर, टॅटू बनवले आहेत. लांब केस असलेला हा टॉमी सिंग उत्सुकता वाढवणारा वाटतो आहे.शाहीदने स्वत: त्याचा फर्स्ट लुक टिष्ट्वटरवर पोस्ट केला आहे. अभिषेक चौबे दिग्दर्शित आणि फँटम फिल्म्स निर्मित उडता पंजाब मध्ये करिना कपूर खान, आलिया भट्ट, दिलजित दोसंघ हे मुख्य भूमिकेत आहेत.चित्रपटाचा ट्रेलर १६ एप्रिल रोजी रिलीज होईल. तर चित्रपट १७ जूनला रिलीज होईल.