Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहिदने मानले चाहत्यांचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2017 18:52 IST

विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच यूट्यूबवर त्याला शेकडो लाईक्स मिळाले. चित्रपटाला मिळत असलेले चाहत्यांचे प्रेम, आशीर्वाद ...

विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच यूट्यूबवर त्याला शेकडो लाईक्स मिळाले. चित्रपटाला मिळत असलेले चाहत्यांचे प्रेम, आशीर्वाद यांच्यामुळे अभिनेता शाहिद कपूर भारावून गेला आहे. त्याने सोशल मीडियावरून चाहत्यांचे आभार मानले आहेत.  ‘रंगून’ या चित्रपटात शाहिदने नवाब मलिक याची भूमिका साकारली असून, चित्रपटातील इतर कलाकारांच्या भूमिकांनाही चाहत्यांचे प्रेम मिळत आहे. शाहिदने त्याचा आनंद सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘रंगूनला मिळत असलेला पाठिंबा आणि प्रेम पाहून मला फार आनंद होत आहे.’ अशी त्याने कॅप्शन दिली आहे. तर ‘चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद हा प्रचंड आहे. चित्रपटाचे कथानक हे सर्वसामान्य पे्रक्षकांना आवडण्यासारखे आहे,’ असे तो सांगतो. कंगना राणौत, शाहिद कपूर व सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या  या चित्रपट मार्च महिन्यात रिलीज होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाचे शूटिंग अरुणाचल प्रदेशातील दुर्गम भागात करण्यात आले होते. द्वितीय महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या चित्रपटात या तिघांचा प्रेम त्रिकोण दाखविण्यात आलेला आहे.