Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहीद म्हणतो,‘ प्रियंकात खुप क्षमता’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 08:14 IST

‘क्वांटिको’ या अमेरिकन टीव्ही शो मध्ये प्रियंकाने काम केले. आणि तिच्या करिअरची गाडी अक्षरश: सुसाट सुरू झाली. शाहीद कपूरने ...

‘क्वांटिको’ या अमेरिकन टीव्ही शो मध्ये प्रियंकाने काम केले. आणि तिच्या करिअरची गाडी अक्षरश: सुसाट सुरू झाली. शाहीद कपूरने नुकतेच प्रियंकाचे कौतुक करत म्हटले आहे की,‘ प्रियंकाचा मला खुप अभिमान वाटतो. तिचे करिअर ज्या गतीने आकार घेत आहे ते पाहून मला तिचा अभिमान वाटतोय. तिची हॉलीवूडमधील घोडदौड ही भारतीयांना चकित करणारी आहे. झी सिनेअ‍ॅवॉर्ड्स २०१६ च्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलतांना शाहीद म्हणाला,‘ आम्हाला सर्वांना प्रियंकाचा खुप अभिमान वाटतोय. भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन ती गेल्याने आम्हाला आनंद झालाय. तिच्यात हॉलीवूडमध्ये टिकण्याची क्षमता आहे. ’