Join us

SHAHID KAPOOR'S PRE-BIRTHDAY PARTY: दीपिका पदुकोन आणि कॅटरिना कैफचा आमना-सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2017 13:23 IST

शाहिद कपूरच्या प्री-बर्थ डे पार्टीमध्ये रणबीर कपूरच्या या दोन्ही एक्स गर्लफ्रेंड्सचा आमना-सामना झाला. प्रथमच अशा प्रकारे भेटत असल्यामुळे तेथे उपस्थित कलाकारांनाही कसे रिअ‍ॅक्ट करावे हे कळेना. मग काय झाले हे जाणून घेण्यासाठी वाचा...

रणबीर कपूर आता चॉकलेट बॉय नाही तर ‘हार्टब्रेकर’ म्हणून जास्त शोभून दिसतो. अभिनय आणि क्युट स्माईलने लाखो चाहत्यांचे हार्ट ब्रेक करणाऱ्या रणबीरने अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींचेही हार्ट ब्रेक केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नाव येते दीपिका पदुकोन आणि कॅटरिना कैफ या दोघींचे.रणबीरच्या या दोन्ही एक्स गर्लफ्रेंड्स नुकतेच एका कार्यक्रमात एकमेकांसमोर आल्या आणि उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. दीपिका आणि कॅट कधीच एकमेकांच्या चांगल्या मैत्रीणी नव्हत्या. शिवाय रणबीरसोबतच्या रिलेशनशिपमुळे तर दोघींमध्ये कधीच पटले नाही अशी चर्चा आहे.म्हणून तर या दोघी एकमेकांना टाळत असतात. मात्र शाहिद कपूरच्या प्री-बर्थ डे पार्टीमध्ये दोघींचा आमना-सामना झाला. शाहिदचा वाढदिवस भले २५ फे बु्रवारीला असेल पण त्याची पत्नी मीराने त्याच्या सर्व सेलिब्रेटी मित्रांना बोलवून आतापासूनच बर्थ डे सेलिब्रेशन करण्याचा निर्णय घेतला.ALSO READ: कॅटरिना कैफला पाहताच का पळाली युलिया वेंटर?या पार्टीत इंडस्ट्रीमधील अनेक दिग्गज सेलिब्रेटींनी हजेरी लावली. त्यामध्ये वरुण धवन, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, करण जोहर, सैफची मुलगी सारा, सोनाक्षी सिन्हा, ‘पद्मावती’ को-स्टार रणवीर सिंग, दीपिका आणि कॅटरिना कैफ यांचा समावेश होता. दीपिकाने गोल्डन रंगाची चकाकणारी पँट आणि काळा टॉप घातलेला होता तर कॅटने फ्लोरल मॅक्सी ड्रेसमध्ये पार्टीची शान वाढविली.पार्टीमध्ये सर्वाची मौज-मजा सुरू असताना या दोघी एकमेकींच्या समोरासमोर आल्या आणि वातावरण बदलून गेले. त्या प्रथमच अशा प्रकारे भेटत असल्यामुळे तेथे उपस्थित कलाकारांनाही कसे रिअ‍ॅक्ट करावे हे कळेना. परंतु सर्वांना आश्चर्याचा धक्का देत दोघी अत्यंत फे्रंडली पद्धतीने भेटल्या. यावेळी कुठेच आॅकवर्डनेस नव्हती.दीपिका आणि कॅटरिनाला असे पाहून उपस्थितांनीही मग मोकळा श्वास सोडला आणि पार्टीमध्ये पुन्हा धमाल सुरू झाली. तत्पूर्वी सोनाक्षीच्या उपस्थितीमुळेही अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. ऐकाकाळी तिचे नाव शाहिदशी जोडण्यात आले होते. त्यामुळे मीराने तिला आमंत्रित केल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले.ALSO READ: ​दीपिका पादुकोणमुळे कॅटरिना कैफचा पत्ता कट?पार्टीतील फोटो:बर्थडे बॉय : शाहिद कपूरनताशाा दलाल,वरुण धवन, कॅटरिना कैफ, सोनाक्षी सिन्हाआलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रासारा अली खान, करण जोहर​   ​ALSO READ: शाहिदच्या पार्टीत हातात हात घालून दिसले वरूण धवन अन् नताशा दलाल!