Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहिद कपूरची मुलगी मीशा मम्मी मीरासोबत करणार टीव्ही डेब्यू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2017 21:03 IST

शाहिद कपूरची चिमुकली मीशा गेल्या काही दिवसांपासून भलतीच चर्चेत आहे. कारण बºयाच ठिकाणी शाहिद पत्नी मीरा अन् आपल्या मुलीसोबत ...

शाहिद कपूरची चिमुकली मीशा गेल्या काही दिवसांपासून भलतीच चर्चेत आहे. कारण बºयाच ठिकाणी शाहिद पत्नी मीरा अन् आपल्या मुलीसोबत स्पॉट झाल्याने तिचे फोटोज सोशल मीडियावर ट्रेण्ड करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच वर्ल्ड डान्स डेनिमित्त शाहिद कपूरने मुलगी मीशाबरोबरचा डान्स करतानाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. हा व्हिडीओ मीडियात प्रचंड व्हायरल झाला होता. बातम्यांनुसार शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत हिला चित्रपटांच्या बºयाचशा आॅफर्स येत आहेत, परंतु त्यास तिने सपशेल नकार दिला आहे. मात्र यावेळेस मीराने अभिनयासाठी होकार दिला असून, लवकरच ती प्रेक्षकांना बघावयास मिळणार आहे. मात्र तुम्ही जर चित्रपटात मीराला बघू इच्छित असाल तर तुमची ही इच्छा कदाचित पूर्ण होणार नाही. कारण मीरा टीव्हीवर अर्थात छोट्या पडद्यावर डेब्यू करणार आहे. एवढेच नव्हे तर मीराबरोबरच तिची चिमुकली मीशाही डेब्यू करणार आहे. शिवाय सध्या मीरा राजपूत तिच्या बॉलिवूड डेब्यूवरूनही खूप बिझी आहे. मीराच्या मते, तिचा बॉलिवूड डेब्यू खूप स्पेशल करायचा आहे. त्यामुळेच ती सध्या प्रोजेक्ट्स फायनल करण्यात व्यस्त आहे. आंतरराष्टÑीय महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मीराने वादग्रस्त वक्तव्य करून वाद निर्माण केला होता. त्यावेळी तिच्यावर चहुबाजूने टीका करण्यात आली होती. अखेर पती शाहिदने मध्यस्थी करून या वादावर पडदा टाकला होता. असो, आता मीरा पुन्हा एकदा अभिनयाकडे वळाल्याने तिच्या फॅन्ससाठी ही खुशखबरीच म्हणावी लागेल. त्याचबरोबर मीरासह मीशाही पडद्यावर बघावयास मिळणार असल्याने फॅन्सना दुहेरी आनंद मिळेल, यात शंका नाही. आता शाहिद, मीरा आणि मीशा या तिघांनीही एकत्र झळकावे हीच त्यांच्या फॅन्सची अपेक्षा असेल.