Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहिद कपूरच्या भावाने श्रीदेवीच्या मुलीला दिले सरप्राइज गिफ्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 20:05 IST

अभिनेत्री श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूर आणि अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर लवकरच ‘धडक’ या चित्रपटातून डेब्यू करणार ...

अभिनेत्री श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूर आणि अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर लवकरच ‘धडक’ या चित्रपटातून डेब्यू करणार आहेत. सध्या या चित्रपटाची शूटिंग सुरू असून, दोघेही शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. अशात ईशान जान्हवीला इम्प्रेस करण्याची एकही संधी सोडत नाही. रिपोटर््सनुसार, ईशानने नुकतेच जान्हवीसाठी चक्क अमेरिकेहून एक गिफ्ट खरेदी करून तिला दिले आहे. मात्र हे गिफ्ट काय आहे, याविषयी फारशी माहिती समोर आली नाही. जान्हवीने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी ‘मॉम’ श्रीदेवीने तिच्यासाठी काही कडक कायदे आणि नियम ठरविले आहेत. यामागचे कारण सांगताना श्रीदेवीने म्हटले होते की, काही काळापूर्वी जान्हवी तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियाला किस करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पार्टीदरम्यान काढण्यात आलेल्या या फोटोत जान्हवी आणि शिखर खूपच जवळ आले होते. यावेळी त्यांनी एकमेकांना किसही केले होते. लेकीचा हा फोटो बघून श्रीदेवीला प्रचंड संताप आला होता. अशात मुलगी चित्रपटांमध्ये पाऊल ठेवत असल्याने तिने मुलीला स्पष्ट शब्दात बॉयफ्रेंडपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. शिवाय तू दुसºया कोणाच्या प्रेमात पडू नये, अशी ताकीदही दिली होती. त्यामुळे ईशानने जान्हवीला दिलेल्या या गिफ्टविषयी अद्यापपर्यंत कुठलीही माहिती समोर आली नसावी, असे बोलले जात आहे. खरं तर श्रीदेवी तिच्या दोन्ही मुलींबद्दल प्रचंड प्रोटेक्टिव्ह आहे. तिने तर मुलींना सेल्फी काढण्यावरही बॅन लावले आहे. रिपोर्ट्सनुसार, श्रीदेवी मुलींना सेल्फी काढू देत नाही. त्यामुळे तिच्या दोन्ही मुलींचे सेल्फी सोशल मीडियावर फारसे दिसत नाहीत. त्याचबरोबर श्रीदेवीने दोन्ही मुलींना त्यांच्या मेल फ्रेंडबरोबर फोटो काढण्यास मनाई केली आहे.