Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mira Rajput: 'माझ्या मुलांची उद्या सकाळी शाळा आहे, मला जाऊ द्या.."; मीराने पापाराझींना केली विनंती, नेटकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 15:22 IST

मीराचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये मीरा खूपच सुंदर दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत देखील सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. अनेकदा ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहते. सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेली मीरा पुन्हा एकदा चर्चेत आहे. सध्या मीराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती पापाराझींना ‘मला घरी जाऊ द्या,’ असं म्हणताना दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत हे इंडस्ट्रीतील क्युट कपलपैकी एक आहेत. या जोडप्याला दोन मुले आहेत. मुलगी मीशा कपूर आणि मुलगा झैन कपूर. दरम्यान, मीराचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये मीरा खूपच सुंदर दिसत आहे. यात तिने व्हाईट आणि  ब्लॅक कलरचा पोशाख परिधान केला आहे.  व्हिडीओमध्ये मीरा तिच्या घराकडे जाताना दिसत आहे. मात्र, मीराला पाहताच पापाराझींनी तिचे फोटो आणि व्हिडीओ घेण्यास सुरुवात केली.

आपल्या भवती पापाराझींचा गराडा पाहून मीरा त्यांना म्हणते की, ‘ मला घरी जाऊ द्या,माझ्या मुलांना उद्या सकाळी शाळेत जायचं आहे. ,’ मीराच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केली आहे. काहींनी मीराचे कौतुक केलं आहे युजर्सनी मुलांना सुट्टी असल्याचंही म्हटलं आहे.

अभिनेता शाहिद कपूरने २०१५ साली मीरा राजपूतशी लग्न केले.  मीरा व शाहिदच्या वयातील अंतर. होय, दोघांच्याही वयात बराच फरक होता आणि यामुळे दोघंही चिंतेत होते. मीरा खूप तरूण होती. तिच्यासोबत लग्न करण्यासाठी शाहिदला आधी तिच्या बहिणीला ‘पटवावं’ लागलं. होय, मीराच्या बहिणीने शाहिदला साथ दिली आणि मीरा शाहिदची झाली. गेल्या वर्षी शाहिद आणि मीरा मुंबईतील वरळी येथील त्यांच्या आलिशान डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले. 

टॅग्स :मीरा राजपूतशाहिद कपूर